तुमसरात काँग्रेसचे संगठन मजबूत करणार

By Admin | Updated: August 12, 2015 00:37 IST2015-08-12T00:37:53+5:302015-08-12T00:37:53+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थेत तुमसर तालुक्यात जरी अपेक्षित यश मिळाले नसले तरी जिल्ह्यात काँग्रेसने घवघवीत यश ...

You will strengthen the organization of the Congress | तुमसरात काँग्रेसचे संगठन मजबूत करणार

तुमसरात काँग्रेसचे संगठन मजबूत करणार

पक्ष कार्यकर्त्यांची घेतली बैठक
तुमसर : स्थानिक स्वराज्य संस्थेत तुमसर तालुक्यात जरी अपेक्षित यश मिळाले नसले तरी जिल्ह्यात काँग्रेसने घवघवीत यश संपादन करून जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला आहे. त्यामाध्यमातूनच तुमसरात नवनवीन विकासात्मक कार्य करून पक्षाचा संगठन मजबुत करून पक्ष बळकटीकरिता विशेष प्रयत्न करणार असे साकोलीचे माजी आ. सेवक वाघाये यांनी तितिरमारे यांच्या निवासस्थानी पक्ष कार्यकर्ताच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद भंडाराचे नवनिर्वाचित अध्यक्षा गिलोरकर, बांधकाम सभापती विनायक बुरडे, खेमराज पंचबुद्धे, प्यारेलाल वाघमारे, प्रमोद तितीरमारे, अमर रगडे, राजेश ठाकूर, निरज गौर, शैलेश पडोळे, सुदेश डुंभरे, आनंद बिसने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार सेवक वाघाये पुढे बोलताना सांगितले की, तुमसर हा काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला असून पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला मदत करून मोठे बनविण्याचे कार्य केले. त्यामुळे तुमसरात काँग्रेसची हाती झाल्याचे दिसून येत असून तुमसरातील काँग्रेस पक्षाची जागा विचलीत करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याच्या बाबीला दुजोरा देत मित्र पक्षाच्या मनसुबा पाडण्याकरिता गावा गावात काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करून जन सामान्यांच्या समस्या सोडवित संगठनातील नाराज कार्यकर्त्यांना परत चार्ज करून संगठनात्मक कार्य करून पक्ष बळकट करण्याच्या कार्याला लवकरच सुरूवात करणार असून भविष्यात जर खासदारकीच्या वेळेत मित्र पक्षासी आघाडी झाली नाही तर अशा वेळेस खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा राहण्याचीही इच्छा सेवक वाघाये यांनी प्रदर्शित केली. त्यामुळेच संपूर्ण जिल्हा पिंजून काढून जिथे जिथे काँग्रेसचे संगठन कमकुवत आहे तिथे जातीने लक्ष घालून विकासात्मक कार्य करून संगठन मजबुतीचे कार्य करणार असल्याचे बैठकीत सांगितले. (शहर प्रतिनधी)

Web Title: You will strengthen the organization of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.