तुमसरात स्मार्ट कार्डने मिळणार तिकीट

By Admin | Updated: August 28, 2016 00:22 IST2016-08-28T00:22:31+5:302016-08-28T00:22:31+5:30

रेल्वे सध्या कात टाकत असून रेल्वे प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध करून देत आहे.

You will get tickets from all smart cards | तुमसरात स्मार्ट कार्डने मिळणार तिकीट

तुमसरात स्मार्ट कार्डने मिळणार तिकीट

आधुनिकता : डिस्प्ले व स्मार्ट कार्ड प्रणाली शुक्रवारपासून सुरु
तुमसर : रेल्वे सध्या कात टाकत असून रेल्वे प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध करून देत आहे. शुक्रवारपासून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तथा स्मार्ट कार्डने रेल्वे तिकीट खरेदी करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरु केली आहे.
मागील अनेक महिन्यापासून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशी गाडीचे डब्बे प्रवाशांना कळावे याकरिता डिस्प्ले बंद होते. याकरिता प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली होती. स्थानिक रेल्वे कमेटी सदस्य तथा आमदार चरण वाघमारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही समस्या दूर करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. शुक्रवारपासून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर स्मार्ट कार्डने तिकीट खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. यामुळे तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून दररोज किमान अडीच ते तीन हजार प्रवाशांची ये - जा आहे. रेल्वे प्रशासनाला या स्थानकावरून मोठा महसूल प्राप्त होतो. परंतु मूलभूत सुविधांचा येथे अभाव आहे. अपंग, वृद्ध महिला, पुरुष प्रवाशांकरिता येथे तीन चाकी रिक्शा व त्याचा मार्ग उपलब्ध नाही. ग्रामस्थांकरिता ये जा करीता पुल अजूनपर्यंत तयार केला नाही. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांवर रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. येथे फुटवे ब्रिज तयार करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: You will get tickets from all smart cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.