तुमसरात सहा घरफोड्या

By Admin | Updated: January 27, 2015 23:26 IST2015-01-27T23:26:54+5:302015-01-27T23:26:54+5:30

शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून

You have six house burglars all over | तुमसरात सहा घरफोड्या

तुमसरात सहा घरफोड्या

तुमसर : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. श्रीरामनगर व विनोबा भावे नागरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.
शहरातील श्रीरामनगर दाट लोकवस्तीचे व अतिमहत्वाच्या लोकांचे समजले जाते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या घरमालकांचे घर चोरट्यांनी फोडले. संतोष खूमन चौधरी यांच्या घरी चोरी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे याच घरी भाड्याने राहतात.
चोरट्यांनी घरी कुणी नाही याच संधीचा फायदा घेतला. आलमारीतील सामान अस्तव्यस्त त्यांनी फेकून दिला. घरातील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्यात काही चांदीच्या दागीन्यांचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री विनोबा नगरातील तथा पोलिस विभागात कार्यरत पोलिस फुंडे यांचे घरही चोरट्यांनी फोडले. २० हजार नगदी व साड्या चोरीला गेल्या. कृष्णा पटले यांचे घरातील ५ तोळे सोन्यांचे दागीने, तसेच कृष्णा पानतावणे, श्यामसुंदर धुर्वे, सुरचंद पांडे, रामदास साखरकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. चोरटयांनी जी घरे कुलूपबंद होती त्या घरांनाच येथे लक्ष्य केले होते.
श्रीरामनगर व विनोबा भावे नगर ही वरची गजबजलेली व नावाजलेली आहे. नोकरदार व लोकप्रतिनिधींचेही वास्तव्य याच परिसरात आहे. ज्या घरी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे हे भाड्याने राहत आहेत. त्याच परिसरात नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांचे वास्तव्य आहे. मानवअधिकार आयोगाचे अध्यक्ष सुध्दा याच परिसरात राहतात. त्यामुळे हा परिसर व्हीआयपी मानला जातो. चोरट्यांनी येथे चोरीचे धाडस केले. प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर पोलिसांची गस्त होती हे विशेष. चोरट्यांची टोळी परप्रांतीय तथा दुसऱ्या शहरातील असेल असा तर्क लावला जात आहे. चोरट्यांचा अद्याप शोध सुरु आहे. दोन दिवसापासून तुमसर पोलिसांनी सापळा रचून गस्त वाढविल्याचे सांगण्यात येते.
आमदारांनी घेतल्या कानपिचक्या
पोलिस ठाण्यात आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी चोरी प्रकरणात पोलिसांच्या कानपिचक्या घेतल्या. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालक व एका पोलिसांच्या घरी घरफोडी झाली तर शहर व या ठाण्यांतर्गत ३२ गावे कशी सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तेच येथे सुरक्षित दिसत नाही. चोरट्यांच्या शोध व वचक ठेवण्याची येथे गरज आहे.
पोलिस विभाग व शहरातील प्रत्येक बुथनिहाय सुरक्षादल निर्माण करुन समन्वय साधण्याची येथे गरज आहे. सुरक्षा दल गठीत करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक किशोर गवई यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: You have six house burglars all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.