तुमसरात मनुष्यबळाचा प्रचंड अभाव
By Admin | Updated: February 17, 2015 01:11 IST2015-02-17T01:11:00+5:302015-02-17T01:11:00+5:30
ब्रिटिशकाळात तुमसर तालुका अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जात होता. भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त स्वातंत्र्य

तुमसरात मनुष्यबळाचा प्रचंड अभाव
पोलिसांचा दरारा आवश्यक : चोरीच्या घटनांत वाढ, गुन्हे, अवैध दारू, अवैध वाहतुकीच्या मुसक्या आवळण्यात यश
मोहन भोयर तुमसर
ब्रिटिशकाळात तुमसर तालुका अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जात होता. भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक तुमसर तालुक्यातील आहेत. अशी नोंद शासनदप्तरी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केवळ एकदा कायदा व सुव्यवस्थेची घडी येथे विस्कटली होती. सर्व जात व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने येथे राहतात. अपवाद वगळता गाव गुंडांचा त्रास नाही. अपराधिक पार्श्वभूमीचे काही गाव गुंडाचे वास्तव्य येथे असले तरी पोलीस प्रशासनापुढे त्यांची डाळ शिजत नाही. तुमसर ठाण्याची ओळख शांत म्हणून असून गुन्हे शोधून काढणारे पोलीस ठाणे म्हणून जिल्ह्यात तुमसरची ओळख आहे.
३२ गाव व शहर सांभाळताना कसरत
तुमसर पोलीस ठाणेअंतर्गत एकूण ३२ गाव व तुमसर शहराचा समावेश होतो. यात वैनगंगा नदीअलीकडील क्षेत्राचा समावेश आहे. तुमसर पोलीस ठाण्याचे क्षेत्र १३ ते १५ कि़मी. लांब आहे. बीट दोन खापा व येरली, पोलीस दुरकेंद्र देव्हाडी येथे आहे. चार सर्कलचा समावेश आहे. तुमसर शहरात सर्कल एक व दोन मध्ये सिहोरा रोड ते तुमसर रोड, दुसऱ्या सर्कलमध्ये तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती ते शहर मोहल्ल्याचा समावेश होतो. तुमसर शहराचे क्षेत्रफळ दोन ते अडीच कि़मी. आहे.
सदनिका जुन्या पण नूतनीकरण केलेल्या
तुमसर पोलीस ठाण्याच्या आवारात अधिकारी तथा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सदनिका आहेत. या सदनिकेत एक दोन अधिकारी कर्मचारी सोडले तर सर्वच पोलीस कर्मचारी सदनिकेत वास्तव्याला आहेत. सदनिका जून्या आहेत, परंतु त्यांची डागडूजी व रंगरंगोटी केल्याने त्या देखण्या आहेत. पोलीस निरीक्षकांचे कार्यालय अतिशय देखणे आहे. सहायक फौजदार व पोलीस उपनिरीक्षकांकरीता येथे स्वतंत्र कक्ष आहे. पोलीस ठाण्यात पुरूष व महिला आरोपींकरिता स्वतंत्र कोठडी आहे.
शहर व गावात गस्तीची गरज
तुमसर शहरासह या ठत्तण्यांतर्गत गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. पोलिसांची गस्त येथे शहरात नियमित आहे. त्यामानाने गावात गस्तीचे प्रमाण नगण्य आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत येथे गस्त सुरू असते. याकरिता तीन दुचाकीवर सहा पोलीस शहरातील इंदिरासागर, दुर्गानगर, गोवर्धननगर, श्रीरामनगर, रेल्वे स्थानक परिसरात गस्तीवर राहतात. दोन चारचाकीवर एक अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी, दुसरी चारचाकी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची असून तीन कर्मचारी येथे गस्तीवर राहतात. पहाटे ५ ला हे पोलीस कर्मचारी घरी जातात. पोलीस निरीक्षकांनी सुटीच्या दिवशीही येथे पेट्रोलींग सुरू केली आहे.
पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभाव
तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत पूर्व ते पश्चिम १२ ते १५ कि़मी. व उत्तर ते दक्षिण १० ते १२ कि़मी. असा क्षेत्रफळ येतो. यात ३२ गावे समाविष्ट आहेत. त्यामाने येथे ३५ कर्मचारी अपुरे आहेत. दररोज घडणाऱ्या घटना, तुमसर शहराचा बंदोबस्त यामुळे पोलीस कर्मचारी त्रस्त असून पोलीसावर ताण येतो. आंतरराज्यीय तुमसर-बालाघाट-कटंगी मार्ग याच शहरातून जातो. रेल्वेस्थानक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचे येथे ये-जा आहे.
पोलिसांचे स्तुत्य उपक्रम
तुमसर पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आलेल्या तंटामुक्त मोहिलेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे २७ ग्रामपंचायती तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह कबड्डी स्पर्धा विदर्भस्तरीय दरवर्षी घेण्यात येतात. पोलीस पाटील तथा तंटामुक्ती अध्यक्षांची महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात येते.
फिटनेससाठी दररोजचे खेळ
पोलिसांच्या फिटनेसच्या दृष्टीकोनातून पोलीस ठाण्यात खेळ होत नाही. मनुष्यबळाचा अभाव लागते. कर्मचारी रिक्त पदे जास्त असल्याने ड्युट्या जास्त लागतात. रात्री गस्त घालणारे पोलीस सकाळी पुन्हा १० वाजता आपल्या कर्तव्यावर रूजू होतात. वैद्यकीय दृष्ट्या हे अत्यंत घातक आहे. अनेक पोलिसांना येथे सुट्या मिळत नाहीत, परंतु येथील पोलीस मात्र शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त दिसतात, हे विशेष.
ठाणे कसे आहे
मागील एका वर्षात अवैध दारू व्यवसायाची २१४ गुन्ह्यांची संख्या १५५, अवैध वाहतूक प्रकरणे १२४१ सुरू आहेत.
कोणती पदे रिक्त
तुमसर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराचे ५, हवालदारांची ७ तर पोलिसांची ३१ पदे रिक्त आहेत. तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्यांतर्गत ४४ गावे येतात तर गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत ४४ गावे येतात. ही स्वतंत्र ठाणी आहेत.