तुमसरात दसरा ठरला राजकीय !
By Admin | Updated: October 13, 2016 00:58 IST2016-10-13T00:58:06+5:302016-10-13T00:58:06+5:30
असत्यावर सत्याचा विजयोत्सव रावणदहनाचा कार्यक्रम तुमसरसह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

तुमसरात दसरा ठरला राजकीय !
फटाक्यांची आतषबाजी : पहेलवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके
तुमसर : असत्यावर सत्याचा विजयोत्सव रावणदहनाचा कार्यक्रम तुमसरसह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी डिसेंबरअखेर नगरपरिषद निवडणुका होत असल्याने तुमसरात तो राजकीय दसरा ठरला. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाने पेंडाल तयार केला होता. आपट्यांची पाने सर्वसामान्य जनतेनी व नेत्यांनी एकमेकांना दिली. रात्री ८.३० वाजता रावणदहन करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. फटाक्यांची आतिशबाजीने तुमसरकरांचे डोळ्यांचे पारणे फेडले.
तत्पूर्वी सकाळी डॉ.सच्चिदानंद फुलेकर यांच्यातर्फे बुद्ध मानवंदना व शिरा दान करण्यात आले. गंज आखाडा व कुंभार आखाडा यांच्या पहेलवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना आश्चर्यचकीत केले. राकाँतर्फे भक्तीगीतांचा आर्केस्ट्राने सर्वांना आकर्षित केले.
भाजप पेंडालमध्ये आ.चरण वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, प्रदीप पडोळे, सुनिल लांजेवार, विजय जायस्वाल, कुंदा वैद्य, प्रशांत शेंडे, प्रमोद घरडे, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, विक्रम लांजेवार, अनिल जिभकाटे, दीपक कठाणे, राकाँ पेंडालात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, उपाध्यक्ष सरोज भुरे, कल्याणी भुरे, देवचंद ठाकरे, अनिल साठवणे, संदीप पेठे, संजय चोपकर, काँग्रेसमध्ये मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितीरमारे, अरविंद कारेमोरे, अमरनाथ रगडे, डॉ.मधुकर लांजे, सीमा भुरे, बाळा ठाकुर, नारायणराव तितीरमारे, लक्ष्मी कहालकर, सविता ठाकुर, किशोर भवसागर, राजू पारधी, सुरेंद्र पाटील, प्रमोद इलमे, नलीनी डिंकवार, शिवसेनेच्या मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, सुधाकर कारेमोरे, लालू हिसारिया, प्रा.कमलाकर निखाडे, नरेश उचिबगले तर लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिकांच्या मंचावर माजी आ.सुभाषचंद्र कारेमोरेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंज आखाड्याचे बडवाईक गुरुजी, सचिन बडवाईक, गोपी बडवाईक, कुंभार आखाड्याचे शंकरदादा बडवाईकसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावणदहन समिती तुमसर तर्फे रावण तयार करण्यात आला होता. रावणदहन समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. लायन्स क्लब तर्फे शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती. तुमसर नगरपरिषदेतर्फे नेहरू क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करून मैदान सुसज्ज करण्यात आले होते.
(तालुका प्रतिनिधी)