पाल्यांना संस्काराचे बाळकडू पाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:59 IST2016-10-13T00:59:22+5:302016-10-13T00:59:22+5:30
विद्यार्थी दशेत आल्यानंतर पाल्यांना मार्गदर्शक करण्यापेक्षा त्यांना जन्मापासूनच संस्कारासह जीवनाचे उद्दिष्ट सांगा.

पाल्यांना संस्काराचे बाळकडू पाजा
राजेंद्र महाडोळे : माळी समाजाचा गुणगौरव व विद्यार्थी मनोबल समारंभ
भंडारा : विद्यार्थी दशेत आल्यानंतर पाल्यांना मार्गदर्शक करण्यापेक्षा त्यांना जन्मापासूनच संस्कारासह जीवनाचे उद्दिष्ट सांगा. मोठे उद्दीष्ट सांगितल्यास किमान त्यापर्यंत मजल गाठता येईल. माळी समाज बांधवांनी व्यवसायासह समाजहितही जोपासावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाचे विदर्भ संघटक अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय माळी महासंघ भंडाराच्या वतीने गणेशपुर येथे अखिल सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी मनोबल मार्गदर्शन समारंभाचे आयोजन आज बुधवारला करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माळी महासंघाचे महासचिव अविनाश ठाकरे, खंडविकास अधिकारी मंजुषा भेदे, तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर, पवन तिजारे, डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, मनोहर बारस्कर, केशवराव निर्वाण, कृष्णराव निर्वाण, कैलास जांगळे, अनिल डोंगरवार, माधुरी देशकर, विजय शहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना महाडोळे यांनी समाजबांधव मर्यादेत न राहता त्यांनी समाजोन्नतीसाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहनही यावेळी केले. दरम्यान कार्यक्रमाला खासदार नाना पटोले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी, भंडारा महिला जिल्हा रुग्णालयाला सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे नामकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे यांनी, आपसातील मतभेद विसरून समाज बांधवांनी एकत्र यावे व विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला यशवंत उपरीकर, लिलाधर बारस्कर, कुसूम कांबळे, संध्या निर्वाण, भागवत मदनकर, रमेश गोटेफोडे, रविंद्र खंडाळकर, रविभूषण भुसारी, अनिल किरणापुरे, नितेश किरणापुरे, अरूण भेदे आदींनी सहकार्य केले. संचालन ईश्वर निकुडे, वृंदा गायधने यांनी केले.(शहर प्रतिनिधी)