खिचडीच्या नावाखाली पिवळा भात
By Admin | Updated: November 23, 2014 23:14 IST2014-11-23T23:14:27+5:302014-11-23T23:14:27+5:30
जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या शालेय पोषण आहाराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शालेय पोषण आहारातून बिस्कीटे

खिचडीच्या नावाखाली पिवळा भात
भंडारा : जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या शालेय पोषण आहाराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शालेय पोषण आहारातून बिस्कीटे व अंडी आधीच गायब झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांना खिचडीच्या नावाखाली पिवळा भात खाऊ घातल्या जात असल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात दिसत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, यासाठी केंद्र सारकारने मध्यान्ह भोजन योजना सुरु केली. अंतर्गत विद्यार्थ्यांना भोजनात आठवड्यातून एकदा खिचडी सोबत सकस आहार दिल्या जावा, त्यात दुध, अंडी, केळी, बिस्कीटे तसेच रोज खिचडी सोबत वेगवेगळ्या डाळीचा समावेश असावा, असे नमूद होते. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन शाळांना स्वयंपाकगृह बांधून दिले. भोजन शिजविण्याठी प्रति विद्यार्थी मानधनाची व्यवस्था करण्यात आली. सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार शाळाांना तांदुळ पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली व इतर साहित्यांसाठी मुख्याध्यापकांच्या नावे विशिष्ट रकमेची तरतुद करण्यात आली. पंरतु या सर्व वस्तू खूपच कमी पहावयास मिळतात. विद्यार्थ्यांना केवळ पोषक खिचडीच्या नावाखाली पिवळा भात दिला जात असल्याचे दिसत आहे.
त्यात डाळ हा पदाथे अतिशय कमी असल्याचे दिसून येते. याकडे शिक्षण विभागाचे व शाळा व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष होत आहे. हा पिवळा भात खाण्याचा आता विद्यार्थ्यांना कंटाळा आला असून ते देखील या भाताकडे आता नाक मुरडत आहे.
या खिचडीत दररोज वेगवेगळ्या भाज्या आणि डाळी असणे अनिवार्य आहे. पण तसे कुठेच दिसत नाही तसेच हे अन्न शिजवित असलेल्या महिलांनाही अत्यल्प मानधन दिले जात असल्याचे महिला सांगत आहे. पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट घेतलेल्या अनेक बचत गटांनी आता काम सोडून दिले आहेत. त्यामुळे अडचण येत आहे.
(नगर प्रतिनिधी)