यावर्षी धानाचे उत्पादन घटणार

By Admin | Updated: November 8, 2014 00:51 IST2014-11-08T00:51:20+5:302014-11-08T00:51:20+5:30

मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.

This year the production of rice will decline | यावर्षी धानाचे उत्पादन घटणार

यावर्षी धानाचे उत्पादन घटणार

साकोली : मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. शासनाने तात्काळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या दुष्काळग्रस्त शेतकरी सावरत नाही तोच यावर्षी पुन्हा निसर्गाने कमाल केली. यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे याहीवर्षी कर्ज फेडीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहणार आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी समस्या असल्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबुन राहावे लागते.
यावर्षी जुन व जुलै महिन्यात मान्सूनचे पाठ फिरविली त्यामुळे पऱ्हे कोमजली. काही गावात दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरवातीचा लागवड खर्च दुबार करावा लागला. आॅगस्ट महिन्यातही पाऊ स समाधानकारक न आल्याने शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागली. शेतकऱ्यांनी यावेळी टॅकरच्या सहाय्याने पाणी देऊ न पऱ्हे कसेमसे जगविले व रोवणीला सुरवात केली तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या थोड्या फार पावसाचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी नक्कीच झाला. मात्र यानंतर सिंचनाची अपूरी सोय ढगाळ वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उपाययोजना कराव्या लागल्या.
आॅक्टोबर महिन्यात काही भागात धानकापनीला सुरवात केली तेव्हा अचानक पावसाचे हजेरी लावून त्याचे नुकसान केले पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने धान्याच्या लोबींतील दाणेही भरले नाही.
त्यामुळे अधिक पिकांची आशा बाळगणाचा शेतकऱ्यांना निराशा होत आहे. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: This year the production of rice will decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.