यशवंत उपरीकर पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:29 IST2016-08-28T00:29:28+5:302016-08-28T00:29:28+5:30

सेंदूरवाफा येथील शिक्षक यशवंत महादेव उपरीकर यांना राज्य शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Yashwant Overrived Award | यशवंत उपरीकर पुरस्काराने सन्मानित

यशवंत उपरीकर पुरस्काराने सन्मानित

साकोली : सेंदूरवाफा येथील शिक्षक यशवंत महादेव उपरीकर यांना राज्य शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा नामदार गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर प्रशांत जगताप, खासदार अमर साबळे, संजय काकडे आणि सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते. पंधरा हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काचे स्वरूप आहे. ग्रामीण भागातील सेवाकार्याचा आढाव्याची दखल घेवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय माळी महासंघ, अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षक संघटना, इंडियन रेडक्रास, सलाम बांम्बे फोंडेसन, माळी वैभव प्रकाशन, म.फुले शिक्षण संस्था नागपूर, प्रबोधन संस्था पुणे या संस्थांशी त्यांचा संबंध आहे. अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, वसंत लाखे, शिक्षणाधिकारी बारस्कार यांच्यासह समाजबांधवांनी त्यांचे कौतूक केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Yashwant Overrived Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.