चुकीच्या लसीने चार वगारीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:30 IST2016-09-02T00:30:53+5:302016-09-02T00:30:53+5:30
म्हशीचे नवजात वगारींची प्रकृती खराब झाल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ नेलेल्या वगारींना चुकीची लस दिल्यामुळे चारही वघारी दगावले. हा प्रकार राजापूर येथे उघडकीस आला.

चुकीच्या लसीने चार वगारीचा मृत्यू
शेतकऱ्यांचे नुकसान : परस्पर शवविच्छेदन करून जमिनीत
तुमसर : म्हशीचे नवजात वगारींची प्रकृती खराब झाल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ नेलेल्या वगारींना चुकीची लस दिल्यामुळे चारही वघारी दगावले. हा प्रकार राजापूर येथे उघडकीस आला.
मागील आठवड्यात होमचंद सयाराम वाघमारे यांच्या मालकीच्या म्हशीने चार वगारीला जन्मास घातले. वघारीची चांगली देखभाल व्हावी याकरिता वाघमारे यांनी वघारीच्या राहण्याची व्यवस्था कोट्यात न करता राहत्या घरात केली. चार दिवसानंतर वघारीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नाकाडोंगरीचे पशुवैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यावेळी येथील परिचराने दूरध्वनी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास माहिती दिली असता २ ला एविलची लस वघारींना टोचण्याचे सांगितले. त्यामुळे परिचरने वघारीला लस टोचली.
काही वेळानंतर वगारीच्या प्रकृतीमध्ये आणखी बिघाड झाल्याचे परिचरला माहिती देण्यात आली. तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होवू शकला नाही. दुसऱ्याच दिवशी त्या वगारी मृत अवस्थेत दिसले. तालुका पशुधन अधिकारी चोपकर यांना माहिती दिली व त्यांनी सिहोरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी पाठविले. मात्र त्या दगावल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)