संविधानविषयी चुकीचे विधान

By Admin | Updated: June 14, 2016 00:21 IST2016-06-14T00:21:13+5:302016-06-14T00:21:13+5:30

एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले.

Wrong statement about constitution | संविधानविषयी चुकीचे विधान

संविधानविषयी चुकीचे विधान

काँग्रेसची मागणी : दोषीविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
भंडारा : एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तत्पूर्वी गांधी चौकात रामबहादूर राय यांच्या पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे योगदान व महानकार्याला संपूर्ण जगाने गौरविले. संविधान लिहताना कुणाची पर्वा न करता दोन वर्ष ११ महिने व १८ दिवस सतत परिश्रम करीत संविधानाची निर्मिती केली. केंद्र शासनाने संविधान व थोरपुरुषांचा अपमान कुणीही करु नये म्हणून कायदा केला. मात्र मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिंकडून वारंवार अपमान केला जात आहे. राय यांनी संविधानाचा अनादर केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दलित, अनुसूचित जातीतील बांधवांच्या भावना भडकविल्याबद्दल अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणवीर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, विनित देशपांडे, दिलीप मेश्राम, स्रेहल रोडगे, धर्मपाल रामटेके, लखनलाल चौरे, चंदु चाचेरे, राहुल तिवारी, यशपाल कामठे, शरद शेंडे, सैय्यद रियाज अली, शमीम पठाण, भावना शेंडे, विनय बन्सोड, सौरव बोरकर, पराग खोब्रागडे, विपुल खोब्रागडे, अखिल तिवाडे, छोटू मामू, लांजेवार, राहूल बडगे, सिध्दार्थ मेश्राम आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Wrong statement about constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.