शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीचीच, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:08+5:302021-06-29T04:24:08+5:30

भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ वाढली असून हा रस्ता छोटा असल्याने नेहमी अपघात होतात. भंडारा शहरातून ...

Wrong side for shortcuts is wrong, time saving can be fatal! | शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीचीच, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी !

शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीचीच, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी !

भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ वाढली असून हा रस्ता छोटा असल्याने नेहमी अपघात होतात. भंडारा शहरातून जाणाऱ्या नागपूर-गोंदिया महामार्गावर दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्याची गरज आहे. गत सहा महिन्यात म्हणजे जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले असून गत वर्षाच्या तुलनेत हे २७ ने अधिक आहेत. ७२ व्यक्तींनी अपघातात आपला जीव गमावला असून गत वर्षी जानेवारी ते मे २०२० या कालावधीत ५५ व्यक्तींनी आपला जीव गमावला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये ७२ व्यक्तींपैकी अतिवेगामुळे ११, डेंजर ड्रायव्हिंगमुळे २९, दारू प्यायल्यामुळे १, राँग साईडमुळे ५ व अन्य कारणांमुळे २६ मृत्यु पावले आहेत. भंडारा-पवनी रस्त्याची उंची जास्त असल्यामुळे महामार्गावरील गावातील जोड रस्त्यांची उंची कमी असल्याने गावकऱ्यांना त्रास होत आहे.

Web Title: Wrong side for shortcuts is wrong, time saving can be fatal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.