वा..रे प्रशासन... बयाण घेणारेच चौकशी समितीत

By Admin | Updated: May 1, 2016 00:17 IST2016-05-01T00:17:46+5:302016-05-01T00:17:46+5:30

'राजाने मारले, नवऱ्याने छळले तर न्याय कुणाला मागायचा’, असा प्रश्न उपस्थित होत असताना न्यायीक प्रशासनाकडे इशारावजा खुण केली जाते.

Wo..your administration ... the person taking the narration in the inquiry committee | वा..रे प्रशासन... बयाण घेणारेच चौकशी समितीत

वा..रे प्रशासन... बयाण घेणारेच चौकशी समितीत

कारभार आरोग्य विभागाचा : बयाण गोपनीय भंगप्रकरण
भंडारा : 'राजाने मारले, नवऱ्याने छळले तर न्याय कुणाला मागायचा’, असा प्रश्न उपस्थित होत असताना न्यायीक प्रशासनाकडे इशारावजा खुण केली जाते. त्यातही न्यायाची दाद राज्याच्या प्रमुखाकडे व नवरीची आस नवरोबाकडे असली, तर न्याय मिळणे कठीणच. अशी स्थिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.
क्लॉस वन ते क्लॉस थ्रीपर्यंतच्या अधिकाऱ्यांची नावे प्रकरणात समाविष्ट असतानाही कारवाईचा बडगा कनिष्ठ कर्मचाऱ्यावर उभारण्यात आला. पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या गोपनीय बयान भंग प्रकरणाचे (फुटल्याचे) खापर आरोग्य सहायिकेवर फोडण्यात आले. विषय कर्तव्यात कसूर करण्याचा असला तरी बयाण नोंदविणाऱ्या अधिकाऱ्यांना खुलेआम पाठीशी घातल्याचे स्पष्टपणे झळकते. वरिष्ठ पातळीवर चौकशी समितीद्वारे लस प्रकरणात कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले होते. एकदा सोडून तीनदा बयाण घेण्यात आले. एखाद्या प्रकरणात बयाण नोंदविणे ही एक अत्यंत गोपनीय बाब समजली जाते. बयाण घेणारे आरोग्य अधिकारी होते. त्यांची नावेही सर्वांनाच सर्वश्रृंत होती. मात्र बयाण सार्वजनिक होणे ही खरच गंभीर बाब आहे. पालकमंत्र्यांनीही प्रकरणाचा अहवाल मागितला. एवढे झाल्यावरही वरिष्ठांकडून बयाण गोपनीय भंग प्रकरणाला फारसे महत्व नसल्याचे म्हटल्या गेले. पैशांचा खेळ मधल्या काळात चांगलाच रंगल्याची चर्चा खुद्द आरोग्य विभागात होती. अधिकारी सुटीवर जाण्यापुर्वी प्रकरणाची चौकशी करण्याकरीता पाच सदस्यीय समिती गठित करून निघून गेले. माहिती अधिकाऱ्याला ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली. एवढे असूनही अधिकाऱ्यांच्या हिम्मतीला दाद द्यायला हवी. समिती गठित करताना बयाण घेणाऱ्या अधिकाऱ्याना चौकशी समितीत स्थान देण्यात आले. परिणामी भविष्यात तरी समितीचा अहवाल शंभर टक्के खरा येणार की अजुन कुण्यातरी अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अन्य कर्मचाऱ्यावर (आरोग्य सहायीकेसारख्या) निशाणा साधणार, ही येणारी वेळ ठरवणार आहे. खैर काहीही असो, गोपनीय बयाण भंग प्रकरणात गठित केलेल्या चौकशी समितीतील नावे ऐकल्यावर 'वा.. रे प्रशासन... तुझा खेळ' असे म्हटल्याखेरीज जाणकार राहणार नाहीत. येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे अशा प्रकरणांची खुलेआमपणे वाट लावली जाईल, बयाण फोडले जातील, यात तिळमात्र शंका नाही. (प्रतिनिधी)

कारभार वाऱ्यावर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुटीवर असल्याने कार्यालय वाऱ्यावर आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी अधीक्षकांंच्या खांदयावर असते.

Web Title: Wo..your administration ... the person taking the narration in the inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.