भंडारा येथे जागतिक क्षयरोग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:28+5:302021-04-01T04:35:28+5:30

मोफत औषधोपचार घेण्याचे जनतेला आवाहन भंडारा : जिल्ह्यात सर्वस्तरावर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिन सर्वस्तरावर साजरा ...

World Tuberculosis Day at Bhandara | भंडारा येथे जागतिक क्षयरोग दिन

भंडारा येथे जागतिक क्षयरोग दिन

मोफत औषधोपचार घेण्याचे जनतेला आवाहन

भंडारा : जिल्ह्यात सर्वस्तरावर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिन सर्वस्तरावर साजरा करण्यात आला. जिल्ह्यात कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिस्तीचे व नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेऊन जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पार पडला.

कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उदापुरे, जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच सामान्य रुग्णालय भंडारा येथील कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांचे हस्ते आरोग्यविषयक चित्ररथाचे लाल फित कापून हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.

चित्ररथाच्या माध्यमातून तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे क्षयरोगाची माहिती प्रसारित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना "वेळ निघून जात जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची" हा रोगाचा मजकूर असलेल्या फेस मास्कचे वाटप करून मुखवटा सेल्फी अभियान राबविण्यात आले जिल्ह्यातसुद्धा मुखवटा सेल्फी अभियान चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व कला प्रश्नमंजुषा क्षयरोगाबाबत रोगाबाबत फलक तयार करणे इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून समाजामध्ये शहर गावविषयक जनजागृती करून जिल्ह्यातील प्रत्येक गाव शहर मुक्त करणे ही संकल्पना साध्य करता येईल. शासकीय आरोग्यसेवा यंत्रणेमार्फत क्षयरोग कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांच्या हस्ते क्षयरोगाचे संशोधक थोर शास्त्रज्ञ डॉक्टर राँबर्ट काँख यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी नितीन वानखेडे यांनी नागरिकांनी क्षयरोगाबाबतची अधिक माहिती जाणून घेणे, क्षयरोगाची लक्षणे निदान व नियमित औषधोपचार तसेच आरोग्य शिक्षण जाणून घेण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त केले. थोर शास्त्रज्ञ डॉ. राँबर्ट काँख बाबर यांनी इ.स. १८८२ साली २४ मार्च रोजी जीवनाचा जिवाणूचा शोध लावला म्हणून दरवर्षी सर्व स्तरावर २४ मार्च जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत भारतातून क्षयरोग उच्चाटनाचे उद्दिष्ट सन २०२५ मध्ये सध्या करायचे आहे. याकरिता शासकीय आरोग्य संस्थेत सोबतच खाजगी व्यावसायिकांनी नोटिफिकेशन करून शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आर एस. फारुकी तसेच जिल्हा परिषद भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. प्रशांत ऊईके यांनी केले आहे.

बॉक्स

क्षयरोगाची रोगाची लक्षणे

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घ ताप, वजनात सतत लक्षणीय घट होणे,खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे व छातीत दुखणे, मानेवर गाठी येणे व भूक मंदावणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

बॉक्स

मोफत औषधोपचार

क्षयरोगाचे निदान सीबीनँट मशीनद्वारे अवघ्या दोन तासात करण्याची सोय जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा येथे उपलब्ध आहे. उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे नवीन तंत्र टूनॅट मशीनद्वारे रुग्णांची मोफत तपासणी क्षयरोगाची मोफत तपासणी क्षयरोगाचे निदान व उपचार सर्व आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहे. क्षयरुग्णाला त्यांचे उपचार कालावधीत सकस आहाराकरिता दरमहा ५०० रुपये केंद्र शासनाच्या पोषण योजनेअंतर्गत त्यांचे बँक खाते मध्ये डीबीटी मार्फत जमा करण्यात येत आहेत.

Web Title: World Tuberculosis Day at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.