जगाला दलाई लामाची आवश्यकता
By Admin | Updated: July 9, 2014 23:18 IST2014-07-09T23:18:15+5:302014-07-09T23:18:15+5:30
तिबेटी जनतेचे हृदयसम्राट आणि जागतिक बौद्धाचे धम्मगुरु प.पा. दलाई लामा हे तिबेटी धर्म, संस्कृती व राष्ट्राच्या स्वातंत्र्याबरोबरच जगभर शांती, अहिंसा व करुणेचा प्रचार व प्रसार करीत आहेत.

जगाला दलाई लामाची आवश्यकता
समारोह : भन्ते दीपंकर यांचे प्रतिपादन
भंडारा : तिबेटी जनतेचे हृदयसम्राट आणि जागतिक बौद्धाचे धम्मगुरु प.पा. दलाई लामा हे तिबेटी धर्म, संस्कृती व राष्ट्राच्या स्वातंत्र्याबरोबरच जगभर शांती, अहिंसा व करुणेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यामुळे आजच्या अणुयुगात संपूर्ण जगाला त्यांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य प्रमुख चैतभूमी मुंबईचे भन्ते दीपंकर यांनी केले.
भारत तिबेट मैत्री संघातर्फे भंडारा येथे वैशालीनगर येथील वाचनालयात आयोजित प.पा. दलाई लामा यांच्या ६ जुलै २०१४ ला आयोजित ७९ व्या जन्मदिन समारोहाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते धम्मरक्षीत होते.
सर्वप्रथम प.पा.दलाई लामा यांच्या दीर्घायुष्य व निरोग आरोग्य लाभावे म्हणून भिक्खू संघाच्या वतीने सामुहिक वंदना प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड म्हणाले की, जगात शांती, अहिंसा व करुणा नांदावी, तिबेटला स्वायतत्ता मिळावी तसेच जगात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून प.पा. दलाई लामा यांना उदंड आयुष्य व निकोप स्वास्थ्य लाभो.
प्रा. सुधाकर साठवणे, एम.डब्लू. दहिवल आदींचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन असित बागडे यांनी, प्रास्ताविक प्रा.मोरेश्वर गेडाम यांनी तर आभार गुलशन गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भिक्खु बांधव उपस्थित होता.
कार्यक्रमासाठी अजय गडकरी, आदिनाथ नागदेवे, चिंतामन बोरकर, अशोक उके, कांबळे गुरुजी, वामन मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष बोरकर बौद्ध इत्यादींनी सहकार्य केले.(नगर प्रतिनिधी)