पवनी वनविभागातर्फे जागतिक वन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:46+5:302021-03-26T04:35:46+5:30

सावरला, निष्टी, घोडेगाव, सिंधी, धानोरी, बेटाळा, रोहना, शिवनाळा आदी गावांमध्ये वनकर्मचारी यांच्यामार्फत स्थानिक नागरिकांना वनांचे महत्त्व समजावून दिले. विविध ...

World Forest Day by Pavani Forest Department | पवनी वनविभागातर्फे जागतिक वन दिन

पवनी वनविभागातर्फे जागतिक वन दिन

सावरला, निष्टी, घोडेगाव, सिंधी, धानोरी, बेटाळा, रोहना, शिवनाळा आदी गावांमध्ये वनकर्मचारी यांच्यामार्फत स्थानिक नागरिकांना वनांचे महत्त्व समजावून दिले. विविध प्राणी पक्षांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील वनग्राम समितीमार्फत घेण्यात आलेल्या रोपवनांना पाणी देणे वणवा न लागू देणे, वर्दळीच्या ठिकाणी भित्तीपत्रके लावणे, गावात लावून जंगलातून मोहफूल, तेंदू पाने सरपण जमा करताना वाघ, बिबट अशा वन्यप्राण्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरता उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली. शिवना येथील ग्रामस्थांकडून वनात श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. यावेळी वृक्षतोड कमी करण्यासाठी वनविभागामार्फत लाभार्थींना गॅस वाटप करण्यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. ही जनजागृती भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी भलावी, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.

Web Title: World Forest Day by Pavani Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.