संस्कृती रक्षणासाठी कार्यशाळा आवश्यक

By Admin | Updated: September 19, 2016 00:42 IST2016-09-19T00:42:50+5:302016-09-19T00:42:50+5:30

संस्कृती रक्षणासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे,...

Workshops required for the protection of culture | संस्कृती रक्षणासाठी कार्यशाळा आवश्यक

संस्कृती रक्षणासाठी कार्यशाळा आवश्यक

पवनीत कार्यशाळा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन, ११ शाळांतून ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग
पवनी : संस्कृती रक्षणासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि विद्या भारती याच्या संयुक्त विद्यमाने पवनी येथे तिसरी भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून वैशालीताई नायगावकर उपस्थित होत्या. त्यांनी संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. त्यासाठी पुढाकाराची गरज आहे, असे सांगितले. भारतीय कला, नृत्य, चित्रकला याविषयीचे सत्र घेण्यात आले. हरीश डेकाटे यांनी नृत्यकला माहिती आणि प्रात्यक्षिक करून घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद झाला. कार्यशाळेचा दृष्टीकोन यशस्वीरित्या पूर्ण झाला. कार्यशाळेला ११ शाळांतून ५२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला वामनराव इटनकर, प्रभुदास खंडाईत, विजयाताई मुंजे, गेंदलालजी कटारे उपस्थित होते. संचालन मनीषा दिघोरे तर प्रास्ताविक व आभार अजिंक्य भांडारकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workshops required for the protection of culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.