शौचालय बांधकामासाठी कार्यशाळा

By Admin | Updated: June 15, 2014 23:23 IST2014-06-15T23:23:25+5:302014-06-15T23:23:25+5:30

प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी,

Workshop for toilets construction | शौचालय बांधकामासाठी कार्यशाळा

शौचालय बांधकामासाठी कार्यशाळा

भंडारा : प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी, याकरिता जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच-उपसरपंच यांची कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली.
सन २०१४-१५ या वर्षात निर्मल भारत अभियानाच्या वार्षिक कृती आराखड्यात ७२ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थ्याकडे सोपा संडासचे बांधकाम करुन त्याचा वापर व व्यवस्थापन लाभार्थ्यांनी करावयाचे आहे. सदर ग्रामपंचायतमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावे, ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करुन तांत्रिकदृष्ट्या बांधकाम करावे, याकरीता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा ठवकर यांचे नेतृत्वात कार्यशाळेचे उद्घाटन रवींद्र जावळे यांचे हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापूरे, पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ.मस्के व अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी रवींद्र जावळे यांनी शौचालयाचे प्रकार, तांत्रिकदृष्ट्या करावयाचे बांधकाम, वैयक्तिक शौचालयाचा आराखडा, बांधकामानंतर त्याचा वापर, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडी येथील शौचालयाचे प्रकार, बांधकाम वापर व व्यवस्थापन यासोबतच शौचालयाची गरज, शौचालयाअभावी गावात होणारी अस्वच्छता, आरोग्यावर होणारा परिणाम, घ्यावयाची काळजी आदी विषयावर माहिती दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच यांनी शौचालयाबाबतचे अनेक प्रश्न विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले. वैयक्तिक शौचालयाकरीता मिळणारा प्रोत्साहन निधी, मिळण्याची प्रक्रिया, ग्रामपंचायतीसोबत रोजगार सेवक यांची भूमिका व जबाबदारी याबाबत कार्यक्रम व्यवस्थापन डी.एस. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. अजय गजापूरे यांनी निर्मल भारत अभियानांतर्गत असणाऱ्या वैयक्तिक शौचालय व इतर कार्यकमाची माहिती दिली. राजेश्वर येरणे यांनी ग्राम पंचायत स्तरावर शौचालयाचे बांधकाम करताना पुरुषांसोबत महिलांचा सहभाग वाढविण्याकरीता ग्रामस्तरीय संवाद उपक्रमाची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबत वेगवेगळे उदाहरणे देऊन पटवून दिले. गजानन भेदे यांनी शौचालयाचे मॉडेल दाखवून त्यांच्या वेगवेगळ्या भागांची कार्य समजावून सांगितले.
पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ. मस्के यांनी गावात पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता राखण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत सरपंच व उपसरपंच यांनी मार्गदर्शक-सल्लागार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन ग्रामस्तरीय नियोजनाद्वारे वेळेत बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला. संचालन व आभार निलिमा जवादे यांनी केले. कार्यक्रमाकरीता सुशांत ढोके, बबन येरणे, उषा वाडीभस्मे, सरोज वासनिक, भूषण मुळे, देवेंद्र खांडेकर, दुष्यंत सेलोकर आदींनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Workshop for toilets construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.