तंबाखू दुष्परिणामांबाबत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:05+5:302021-03-25T04:34:05+5:30
कोरोना रोगाचा वाढता प्रभाव एक चिंतेची बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व धूम्रपान या रोगास पोषक असल्याने ...

तंबाखू दुष्परिणामांबाबत कार्यशाळा
कोरोना रोगाचा वाढता प्रभाव एक चिंतेची बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व धूम्रपान या रोगास पोषक असल्याने तंबाखूजन्य पदार्थांचे वापर कसा टाळता येईल याकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. मंगळवार रोजी जिल्हा न्यायालय भंडारा येथे तंबाखूचे दुष्परिणाम व कोटपा कायदा २००३ बाबत जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेला जिल्हा न्यायाधीश ॲड. वाळके, ॲड. आर. के. सक्सेना, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. मनीष बत्रा, जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश कुकडे, आरती येळणे, सपना ठाकरे तसेच भंडारा जिल्हा न्यायालयातील वकील मनीष दयाल, सोनिका कडव, प्राजक्ता पेठे आदी उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश ॲड. वाळके यांनी कायदेविषयक साक्षरता शिबिर तर कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ शरीरास हानिकारक कसे याबाबत डॉ. शैलेश कुकडे, डॉ. मनीष बत्रा व डॉ. रत्नाकर बांडेबुचे यांनी मार्गदर्शन केले.