आदेशानंतरही कामगार वेतनापासून वंचित

By Admin | Updated: January 7, 2015 22:47 IST2015-01-07T22:47:41+5:302015-01-07T22:47:41+5:30

युनिव्हर्सल फेरो कारखान्यातील १,२०० कामगारांपैकी केवळ ३०० कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेतन व बोनस दिले. तर उर्वरित ९०० कामगारांना अजूनपर्यंत वेतन व बोनस दिले नाही.

Workers' wages are denied to the workers | आदेशानंतरही कामगार वेतनापासून वंचित

आदेशानंतरही कामगार वेतनापासून वंचित

तुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखान्यातील १,२०० कामगारांपैकी केवळ ३०० कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेतन व बोनस दिले. तर उर्वरित ९०० कामगारांना अजूनपर्यंत वेतन व बोनस दिले नाही. तत्पूर्वी औद्योगिक न्यायालयाने सर्वच कामगारांना शंभर टक्के वेतन देण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणात ९०० कामगारांनी एल्गार करण्याचा निर्णय घेतला असून उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते.
तुमसरजवळ मानेकनगर येथे युनिव्हर्सल फेरो अ‍ॅन्ड अलाईड केमिकल्स हा मॅग्नीज शुध्द करणारा कारखाना आहे. या कारखान्यात १२०० कामगार कार्यरत होते. कारखान्याने वीज देयक न भरल्यामुळे १९९६ मध्ये वीज पूरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने १,२०० कामगारांना ले-आॅफ (अर्धा पगारी कामावर ठेवले होते. महाराष्ट्र फेरो अलाईड कामगार संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली. खटला सुरु असताना कारखान्याने १९९९ पासुन अर्धा पगार देणे बंद केले. कारखाना व्यवस्थापन व कामगार संघटनेत १९९९ मध्ये करार करुन ९०० कामगारांना ऐच्छिक सेवानिवृत्ती अंतर्गत कामावरुन कमी केले. ले-आॅफ चा खटला औद्योगिक न्यायालयात सुरुच होता.
५ फेब्रुवारी २००३ ला औद्योगिक न्यायालयाने एकूण १२०० कामगारांना शंभर टक्के वेतनदेण्याच्या आदेश दिलापण तो आदेश चुकीचा आहे असे सांगून कंपनी व्यवस्थापनाने नागपूर येथे उच्च न्यायालयात अपील केले. हा खटला सुरु असताना कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेने ३० एप्रिल २०१३ मध्ये एका करारा अंतर्गत उच्च न्यायालयातून सदर खटला मागे घेतला. १२०० कामगारांना वेतन न देता केवळ ३०० कामगारांना देण्यात आले. उर्वरित ९०० कामगारांना वेतन व बोनस अद्यापपावेतो मिळाला नाही. या प्रकरणात ९०० कामगारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्याला शासनाने कोणतीही सवलत देऊ नये, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या कारखान्याच्या विरोधात ९०० कामगार उग्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करुन तिव्र आंदोलनाचा इशारा कामगार प्रतिनिधी रामलाल फंदी व सेवकराम रोकडे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workers' wages are denied to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.