शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोको ट्रेनच्या धडकेत कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

तो सनफ्लॅगमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होता. मंगळवारी रात्री कार्यरत होता.  लोको पॉयलट ट्रेनद्वारा होणारी माल वाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलच्या सहायाने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान माल वाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू असताना लोको पॉयलटच्या चुकीने विकास दोन्ही डब्याच्या मध्यात अडकला. जोरदार धडक बसून त्यात त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसनफ्लॅग कंपनीतील घटना : मृतदेहासह कुटुंबीयांचा कंपनीसमोर आक्रोश

  लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : माल वाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगार ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३५ वाजताच्या सुमारास येथील सनफ्लॅग ऑयर्न ॲन्ड स्टील कंपनीत घडली. हाकेच्या अंतरावर असलेल्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती तीन तासानंतर दिली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर मृतदेहासह आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.विकास गणवीर ५३, रा. शास्त्री वॉर्ड वरठी असे मृताचे नाव आहे. तो सनफ्लॅगमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होता. मंगळवारी रात्री कार्यरत होता.  लोको पॉयलट ट्रेनद्वारा होणारी माल वाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलच्या सहायाने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान माल वाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू असताना लोको पॉयलटच्या चुकीने विकास दोन्ही डब्याच्या मध्यात अडकला. जोरदार धडक बसून त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या कुटुंबियांना अपघाताची माहिती तीन तासानंतर दिली. किरकोळ अपघात झाल्याचे कळविल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर बुधवारी सकाळी कुटुंबाला आर्थिक मदत, नौकरी व तांत्रिक शिक्षण देण्याची मागणी करत कंपनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मृतदेहासह आंदोलन करण्यात आल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला. डॉ. विनोद भोयर यांच्या नेतृत्वात माजी सरपंच संजय मिरासे, सुमीत पाटील, रितेश वासनिक, अतुल भोवते, अरविंद येळणे, शरद वासनिक, मिलिंद धारगावे, सुरेखा हुमणे, वसंत हुमणे, दिलीप उके यांनी आंदोलन केले. त्यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पुढाकार घेत कंपनी व्यवस्थापन आणि कुटुंबीया संवाद घडून आणला. सहा तासानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. विकासच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई आहे. विकास हा घरातील एकमेव कमावता पुरूष होता. मुले शिक्षण घेत असून पती-पत्नी मिळून मोलमजुरीच्या भरोशावर कुटुंबाचा गाढा हाकत होते.

हुंदके आणि हक्काचा लढा विकासची पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, बहीण सुरेखा यांच्यासह गावकरी कंपनीसमोर ताटकळत होते. घरचा आधार गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून हुंदके देत न्यायाचा लढा लढत होते. वडिलांचा मृतदेह पाहून मुलींचा आक्रोश सुरू होता. आधार गमावल्याने कस जगायच, असे अनेक प्रश्न निर्माण झाले हाेते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूधारा लागल्या होत्या. 

 

टॅग्स :Accidentअपघात