कामगारांचे जेलभरो

By Admin | Updated: August 10, 2016 00:12 IST2016-08-10T00:12:04+5:302016-08-10T00:12:04+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आयटक व केंद्रीय कामगार संघटनांच्या जेलभरो ...

Workers' jail | कामगारांचे जेलभरो

कामगारांचे जेलभरो

आयटकचे आंदोलन : ९५१ कामगारांची अटक व सुटका
भंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आयटक व केंद्रीय कामगार संघटनांच्या जेलभरो आंदोलनाच्या आवाहनानुसार क्रांतिदिनी भंडारा जिल्ह्यातील आयटकप्रणित विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात ९५१ कामगारांना अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली़
आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य आंगणवाडी, बालवाडी कमर्चारी युनियन, महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कमर्चारी युनियन, आशा कमर्चारी युनियन, शालेय पोषण आहार कमर्चारी युनियन, अंशकालीन आरोग्य स्त्री परिचर युनियन, बांधकाम कामगार युनियन, घरेलू कामगार मोलकरीण संघटना, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, किसान सभा तसेच आंगणवाडी कमर्चारी सभा महाराष्ट्र आदी संघटनांच्यावतीने मंगळवारला दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक येथून आयटकचे शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, हिवराज उके, सविता लूटे, गजानन लाडसे, किसनाबाई भानारकर, सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतरीत झाला. त्यानंतर शिवकुमार गणवीर व हिवराज उके यांनी संबोधित केले. त्यानंतर रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करण्यात आले. कामगार रस्त्यावर येताच पोलिसांनी अटक केली. यावेळी मोर्चेकऱ्यांना कारधा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी सरकार चले जाव १०० एफडीआय रद्द करा, असंघटीत कामगारांना, १८ हजार रूपये किमान वेतन द्या, कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम करणारा कामगारांना, नियमित करा, सर्वांना पेंशन, कायदा, लागु करा, सार्वजनिक वितरण प्रणाला मजबूत करा, महागाई कमी करा, नवीन रोजगार निर्माण करुन बेरोजगारांना रोजगार द्या आदी मागण्या होत्या. जेलभरो आंदोलनात शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, हिवराज उके, सदानंद इलमे, सविता लूटे, गजानन लासे, आशिया मेश्राम, सुनंदा दहिवले, राजु बडोले, गजानन पाचे, झुलन नंदागवळी, रामलाल बिसने, माणिक लांबट, वामनराव चांदेवार, मंगला गजभिये, अलका बोरकर, गौतमी मंडपे, रिता लोखंडे, क्षिरसागर, वुंष्ठदा भदाडे, ताराचंद देशमुख, कल्पना साठवणे, शोभा बोरकर, पुष्पा हुमने, संगीता सुखदेवे, भाग्यश्री उरकुडे, रुंदा मोहतुरे, हेमराज वाघाडे, विनोद पटले, मारोती चेटुले, ज्ञानेश्वर मेश्राम व कामागारांचा समावेश होता़ (शहर प्रतिनिधी)

Web Title: Workers' jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.