डांबरीकरणाची कामे ठप्प
By Admin | Updated: December 7, 2014 22:46 IST2014-12-07T22:46:30+5:302014-12-07T22:46:30+5:30
पवनी - गोसीखुर्द मार्गावरील सिंदपुरी इटगावच्या दरम्यान करण्यात येत असलेल्या डांबरीकरणावर दोन महिन्यापासून चुरी टाकण्यात आली आहे. ती तशीच पडून आहे व रस्त्याच्या बाजूला गिट्टी

डांबरीकरणाची कामे ठप्प
गोसे (बु.) : पवनी - गोसीखुर्द मार्गावरील सिंदपुरी इटगावच्या दरम्यान करण्यात येत असलेल्या डांबरीकरणावर दोन महिन्यापासून चुरी टाकण्यात आली आहे. ती तशीच पडून आहे व रस्त्याच्या बाजूला गिट्टी बोल्डरचे ढिग पडून आहेत. तरीही कंत्राटदार लक्ष देत नसल्यामुळे याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला व पर्यटकांना होत आहे.
सिंदपुरी ते गोसीखुर्द दरम्यानचा रस्ता पूर्णत: खराब झाला. जागोजागी मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्यांची संख्या ३०० ते ४०० पर्यंत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे येणे करणे म्हणजे जीव धोक्यात टाकणे आहे. या परिसरातील जनतेने हा रस्ता दुरुस्त करून देण्याची अनेक वेळा मागणी केली आहे.
या मागणीचा विचार करून सिंदपुरी ते इटगावच्या दरम्यान डांबरीकरणाच्या कामाला दोन महिन्यापूर्वीपासून सुरुवात करण्यात आली आहे. पण हे डामरीकरण करताना पूर्वीच्या रस्त्यावरच डांबराचा हलका फवारा मारून थातूर मातूर गिट्टी बोल्डर टाकण्यात आले व त्यावर चुरी पसरविण्यात आली. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी फुटून गिट्टी इतरत्र विखुरली आहे. हे काम एक किलोमीटर पर्यंत करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला गिट्टी बोल्डरचे ढिगारे लावून ठेवण्यात आले आहेत. हे काम दोन महिन्यापासून बंद असून ठप्प पडले आहे. त्यामुळे याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला व पर्यटकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)