साकोलीत ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: February 21, 2016 00:25 IST2016-02-21T00:25:43+5:302016-02-21T00:25:43+5:30
ग्रामपंचायत भुयार पंचायत समिती पवनी येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तात्काळ बदली पवनी तालुक्याबाहेर करा...

साकोलीत ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन
अधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा सर्वांना निलंबित करा
साकोली : ग्रामपंचायत भुयार पंचायत समिती पवनी येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तात्काळ बदली पवनी तालुक्याबाहेर करा अन्यथा जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे तात्काळ सामूहिक निलंबन करा या मागणीला घेवून साकोली तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचे पंचायत समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुार १२ ला ग्रामपंचायत कार्यालय भुयार येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर व सरपंच दुर्गा भोयर यांना ग्रामपंचायत सभागृहात मासिक सभेचे कामकाज पार पाडित असताना गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सभेत हल्ला करून चपलांनी मारहाण केली. सदर घटनेची तक्रार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पोलीस स्टेशन पवनीला नोंदविली. त्यामुळे आपल्यावर कार्यवाही होईल या भितीने हल्लेखोरांनी खोटी अॅट्रासिटीची तक्रार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेविरोधात नोंदविली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामविकास अधिकारी भटकर यांची तात्काळ तालुक्याबाहेर बदली करण्यात आली. बदली संबंधी काही अडचणी असल्यास बदली सबंधित प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त नागपुर यांना पाठवून तात्काळ बदलीची कार्यवाही करावी.
सदर प्रकरण अतिशय गंभीर असून ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तालुक्याबाहेर बदली न केल्यास ग्रामविकास अधिकारी भटकर यांच्या जीवीताला हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी भटकर यांना दोन मुले असून एक मुलगा सेरेब्रल फालसी या आजाराने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्यांचे कुटूंब उघड्यावर येईल. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.
या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष रवि खोटेले, मानदअध्यक्ष भोजराम कोेचे, सचिव मिलिंद दरवरे, राज्य कार्यकारिणीचे विलास मुंडे, होमेश्वर लंजे, राजकुमार पटले, सरचिटणीस विनोद भेंडारकर, सोमेश्वर पडारे, माधव, गायकवाड, कांचन कुंभारे, हिरालाल खंडाईत, युवराज तलमले, शैलेश नंदेश्वर, प्रिती राऊत, भारती गेडाम, सुरेश राऊत यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित आहेत. (तालुका प्रतिनिधी)