निधीअभावी सिंदपुरी तलावाचे काम रखडले
By Admin | Updated: April 11, 2015 00:30 IST2015-04-11T00:30:03+5:302015-04-11T00:30:03+5:30
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असलेल्या सिंदपुरी येथील मामा तलावाचा विकास कृती आराखडा असणारा अडीच कोटीचा प्रस्ताव शासन दरबारात सादर करण्यात आलेला आहे.

निधीअभावी सिंदपुरी तलावाचे काम रखडले
अडीच कोटींचा प्रस्ताव : राजकीय पुढारी निधी खेचून आणतील काय?
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असलेल्या सिंदपुरी येथील मामा तलावाचा विकास कृती आराखडा असणारा अडीच कोटीचा प्रस्ताव शासन दरबारात सादर करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप निधी प्राप्त झाले नसल्याने विकास कामे रखडली आहेत.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील ३ हजार लोकवस्तीच्या सिंदुपरी गावात १७ हेक्टर आर जागेत खाजगी आणि शासकीय तलाव आहे. यात शासनाची ४ हेक्टर आर सिंमाकित क्षेत्र आहे. या तलावात सिंदपुरी, मोहाडी खापा, मांगली, टेमनी आदी गावातील शेतकऱ्यांची शेती असून ६०० एकर जागेत तलावाची सिंचन क्षमता आहे. पावसाळ्यात तलावात पाणी अडविण्यात येत आहे.
पावसाळा ओसरताच पाण्याची गरज भासल्यास शेतकरी पाण्याचे वाटप करीत आहेत. दरम्यान जुलै २०१४ या महिन्यात तलावाची पाड फुटल्याने हा तलाव आणि गाव चर्चेत आलेला आहे. तलावातील पाणी गावात शिरल्याने ११० घरे प्रभावित झाली आहेत. तर अनेक घरांचे नुकसान झाले.
तब्बल ४८ तास तलावाचे पाणी गावात होते. यामुळे पाणी ओसरताच अनेक घरे भुईसपाट झाली तर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. उभा धानपिक या पाण्यात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावा लागला. जिल्हा परिषद तथा स्थानिकस्तर या दोन विभागाच्या लघु पाठबंधारे विभागात जबाबदारी स्विकारणे वरून वाद निर्माण झाला. गावकऱ्याचे संसार उघड्यावर असताना विभागाने भांडण जुंपल. गावकऱ्याची सोय जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिरात वास्तव्यासाठी करण्यात आली. गावकऱ्यांना शासकीय मदतीसाठी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महसूल विभागाची मदत, खाजगी स्वयंसेवी संस्था यांची मदत गावातील बेघर कुटूंबियांना मिळाली. याच मदतीतून २५ कुटूबियांचे टिनाचे शेड तयार करण्यात आली आहेत. गावातील गरजु आपातग्रस्तांना न्याय देण्यासाठी घरकुलाची यादी तयार करण्यात आली तर तलावाचा विकास कृती आराखडा करण्यात आलेला आहे. लघु पाटबंधारे स्थानिक स्तर यांनी २ कोटी ४० लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता तथा मुख्य अभियंता यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्ताव मंत्रालयात पोहचला आहे. परंतु निधी मंजुरीची माहिती सांगणारे कुणी नसल्याचे धक्कादायक वास्तवे पुढे आले आहे. गावकऱ्यांना हादरून सोडणाऱ्या तलावाचे जिर्णाेद्वार करण्यात अद्याप सुरूवात झाली नाही. यामुळे गावकरी पुन्हा भयभित झाली आहे. तलावाच्या विकास कामासाठी यंत्रणेला अल्प कार्यकाळ मिळणार आहे. यामुळे तलावाचे विकास कामे पूर्ण होणार किंवा नाही, अशी साशंकता गावकरी आणि शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. गावकऱ्यांची कागदी घोडे नाचविल्याने समस्या सुटणार नाही. दिसाहीन राजकीय आश्वासनाने गावकऱ्यांना आधार मिळणार नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी मुंबई, दिल्ली दरबार गाजविण्याची आवश्यकता आहे. बड्या राजकीय पुठाऱ्यांना या गावाची व्यथा माहित आहे. त्यांनी प्रत्यक्षात गावात पाणी केली आहे. यामुळे निधी खेचून आणण्याची जबाबदारी त्यांची आहे. (वार्ताहर)
टिनशेडमध्ये सुविधांचा अभाव
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात २५ कुटुंबीयांचे टिनशेडमध्ये वास्तव्य आहे. बहुतांश वास्तव्य करणारे शेतकरी आहेत. शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाणी वाहून जाणारे नाली तथा शौचालयाचे बांधकाम नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाली आहे. स्वच्छतेचा शाळेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता हिच शाळा घाणीच्या विळख्यात सापडली असून विद्यार्थी वैतागली आहेत. या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.