काम खासगीतील; वेतन वनविभागाच्या तिजोरीतून

By Admin | Updated: September 10, 2016 00:38 IST2016-09-10T00:38:11+5:302016-09-10T00:38:11+5:30

भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या अनेक अनियमित प्रकरणांची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे.

Work in private; From the wage house segment | काम खासगीतील; वेतन वनविभागाच्या तिजोरीतून

काम खासगीतील; वेतन वनविभागाच्या तिजोरीतून

वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचा प्रताप : वर्षभरापासून महिला व्हॉऊचर वेतनावर
प्रशांत देसाई भंडारा
भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या अनेक अनियमित प्रकरणांची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे. त्यात आणखी एक भर पडली असून त्यांच्या शासकीय क्वॉर्टरवर एक महिला मजूर कामाला आहे. ही महिला साहेबांनी स्वत:च्या कामासाठी ठेवली असतानाही तिला वेतन मात्र, शासकीय तिजोरीतून देण्यात आल्याने शासनाला हजारोंचा चूना लावण्यात आलेला आहे.
भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे संंजय मेश्राम हे १ सप्टेबर २०१५ ला भंडारा येथे रूजू झाले. त्यांना येथे आता वर्षभराचा कालावधी झालेला आहे. या वर्षभरात त्यांनी वनविभागाच्या संपत्तीवर अनेक बाळेबोरे केल्याचा व तेवढाच रंजक प्रकार नित्याने बाहेर येत आहे. सुरूवातीला त्यांचा कोका विश्रामगृहाचे लाकडी साहित्य अफरातफर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, मेश्राम यांनी साहित्याची अफरातफर केली नसून अनेक साहित्य कोकाला परत पाठविल्याचा बनाम करण्यात आला. मात्र, तिथे दोन दरवाजे व ३५ सिमेंट पत्रे वळगळता कुठलेही साहित्य परत पाठविले नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यातही या सर्व साहित्यांचा लिलाव करण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांचे आहे. परंतु लाकूड साहित्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रकरण अंगलट येईल, या भितीने मेश्रांम यांनी सर्व साहित्य त्यांच्या क्वॉर्टरमध्ये परत बोलावून ते दडवून ठेवलेले आहे. शासकीय साहित्य स्वत:च्या क्वॉर्टरमध्ये ठेवण्याचा असा कुठलाही अधिकार त्यांना नसतानाही त्यांनी असा प्रकार केलेला आहे. यावरूनच हा सुस्थितीतील साहित्यांचीही त्यांना विल्हेवाट लावायची असल्याचे दिसून येते. यासोबतच उपविभाग व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या परिसरातील वृक्षांची कटाई करण्यात आली. या वृक्षकटाईला पालिका प्रशासनाने परवानगी दिलेली नसतानाही कटाई केल्याचे गंभीर प्रकार मेश्राम यांनी केलेला आहे. यासोबतच मेश्राम यांचे अनेक रंजक प्रकरण आता समोर येऊ लागली आहे.
मेश्राम यांचे कुटुंब नागपूरला राहत असल्याने ते एकटेच त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहतात. त्यामुळे त्यांनी वर्षभरापासून एक महिला मजूर त्यांच्या येथील कामासाठी ठेवलेली आहे. त्यांनी स्वत:च्या कामासाठी ठेवलेल्या या महिलेचे वेतन ते शासकीय तिजोरीतून देत आहे. या महिलेला त्यांनी दैनंदिनी मजूर म्हणून ठेवले असून तिला २९६ रूपये ४८ पैसे अशी मजूरी दिल्या जात आहे. विशेष म्हणजे तिच्या महिन्याचे वेतन व्हॉऊचरवर होत असल्याने तो शासकीय तिजोरीतून देण्यात येत आहे. कामे करायची साहेबांच्या घरची व वेतन द्यायचे शासकीय तिजोरीतून. असा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू आहे. प्रकरण अंगलट येईल या भितीने सदर महिला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावरील नर्सरीत कार्यरत असल्याचे दाखवून तिचे व्हॉवचर बनविण्यात आलेले आहे. कारण सदर महिला मजूर ही कधीच नर्सरीत कामावर कुणाला दिसली नाही. उलट ती महिला मेश्राम यांच्या क्वॉर्टरवरच कामावर दिसत असल्याची चर्चा आता वनकर्मचाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. मागील आठवड्यात मेश्राम यांनी सदर महिलेचे वेतनाचे व्हॉऊचर बनवून वनविभागाच्या कार्यालयात पाठविले. परंतु, ‘लोकमत’मध्ये वृत्त मालिका सुरू असल्याने त्यांनी व्हॉऊचर परत बोलवून फाडल्याचेही वनकर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

मेश्राम यांना पाठिशी घालणारे कोण?
वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचे अनेक प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहेत. अशा स्थितीत वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यांची चूक स्पष्टपणे दिसत असतानाही त्यांना पाठिशी घालीत आहे. तर पंधरवाड्यापूर्वी उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी क्षुल्लक कारणावरून येथील दोन वनकर्मचाऱ्यांना त्यांची बाजू न ऐकता तडकाफडकी निलंबीत केले. वर्मा यांनी त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतलेली ही भूमिका दुटप्पीपणाची वाटते. त्यामुळे वर्मा यांच्या भूमिकेबाबत वनकर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मेश्राम यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता वनकर्मचारी करणार असून त्यासाठी वनकर्मचारी स्वाक्षरी मोहिम राबवित असल्याचेही बोलले जात आहे.

तीन महिन्यापूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व डीएफओ बंगल्यावरील नर्सरीत ती महिला मजूर म्हणून कामावर होती. मी तिला माझ्या क्वॉर्र्टरवर झाडूपोछा व स्वयंपाक करून देण्याचे काम दिले. या कामाचे तिला स्वत:कडून आर्थिक मोबदला देत आहे. शासकीय पैशाचा गैरवापर केलेला नाही.
-संजय मेश्राम,
वनपरिक्षेत्राधिकारी, भंडार

Web Title: Work in private; From the wage house segment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.