पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु

By Admin | Updated: March 24, 2015 00:19 IST2015-03-24T00:19:37+5:302015-03-24T00:19:37+5:30

येथील ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे व डागडुजीचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरु आहे.

The work of Pawneet beautification started | पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु

पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु

पवनी : येथील ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे व डागडुजीचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरु आहे.
पवनीचा ऐतिहासीक, प्राचीन परकोट सदृष किल्ला फार प्राचीन आहे. या किल्ल्याची निर्मिती भोसले राजाने केली आहे. पुर्वीच्या काळी पवनी नगराचे सरंक्षण करण्याकरीता तिन्ही बाजूने किल्ला बांधण्याचे काम करण्यात आले. तर चवथी बाजू वैनगंगा नदी आहे. हा प्राचीन किल्ला आपली इतिहासाची साक्ष देत आज ही उभा आहे. हा किल्ला पवनीची ऐतिहासिकतेची ओळख बनला आहे.
तालुक्यात पर्यटन क्षेत्रात फार झपाट्याने वाढ होत आहे. वाढत असलेल्या पर्यटनस्थळात येथील किल्ल्याचाही समावेश आहे. या किल्ल्यात रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. या किल्ल्याच्या काही ठिकाणी पडझड झाली होती. ही पडझड भरुन काढण्याचे व किल्ल्याच्या काही ठिकाणी पडझड झाली होती. ही पडझड भरुन काढण्याचे व किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे काम पुरातत्व विभागातर्फे मागील काही दिवसापासून सुरु करण्यात आले आहे. पण या किल्ल्याला लागणाऱ्या विशिष्ट दगडांचा पुरवठा बाहेरुन होत असल्याने तुटवडा पडत आहे. तरीही हळूवार काम सुरु आहे. हे काम झाल्यानंतर या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात अजूनही भर पडणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The work of Pawneet beautification started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.