गणेशपुर उपसा सिंचन योजनेचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:00+5:302021-02-24T04:37:00+5:30

तुमसर: आदिवासीबहुल गणेशपुर परिसरात ३५ कोटींची उपसा सिंचन योजना चे काम रखडले आहे २०१८ मध्ये विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सर्वे ...

Work of Ganeshpur Upsa Irrigation Scheme stalled | गणेशपुर उपसा सिंचन योजनेचे काम रखडले

गणेशपुर उपसा सिंचन योजनेचे काम रखडले

तुमसर: आदिवासीबहुल गणेशपुर परिसरात ३५ कोटींची उपसा सिंचन योजना चे काम रखडले आहे २०१८ मध्ये विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सर्वे करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मुंबई मंत्रालयात धूळखात पडून आहे. त्यामुळे आदिवासींच्या शेती सिंचनाअभावी पडीक आहेत.

बावन थ डी प्रकल्पाजवळ गणेश पुर,पवणारखा री, येदर बुची,सुंदर टोला, सितासावांगी, गोबरवाही,हे टी टोला या गावाकरिता गणेशपुर उपसा सिंचन योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे ३५ कोटींची योजना तयार करण्यात आली विदर्भ सिंचन महामंडळातर्फे या योजनेचा सर्वे करण्यात आला. तसा प्रस्ताव मुंबई मंत्रालयाकडे पाठविण्यात आला परंतु सदर प्रस्ताव धूळखात अजूनही प डू न आहे. त्यामुळे आदिवासीची शेती सिंचनाअभावी पडीक आहे. या परिसरात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे त्यांना रोजगार करता भटकावे लागते सिंचनाची सोय निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना येथे शेतीतून पिके काढण्यास मदत होईल. बाव न थ डी प्रकल्पातून येथे सिंचनाची सोय होऊ शकते लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची गरज आहे.

रोटेशन पद्धती बंद करावी: बावनथडी प्रकल्पातून रोटेशन पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यात येते. सदर पद्धती बंद करावी.प्रकल्पाजवलील गावातील शेतीचे पाणी वीसर्गामुळे मोठे नुकसान होत आहे. कायमस्वरूपी तोडगा येथे काढण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे

Web Title: Work of Ganeshpur Upsa Irrigation Scheme stalled