शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
5
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
6
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
7
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
8
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
9
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
10
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
11
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
12
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
13
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
14
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
15
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
16
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
17
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
18
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
19
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
20
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

नावीन्यपूर्ण संकल्पनेतून स्वच्छतेचे कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:32 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत.

ठळक मुद्देरवींद्र जगताप : भंडारा येथे स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रम, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. त्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा विषय आहे. स्थानिक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शाश्वत स्वच्छतेचे चक्र पूर्ण करायचे आहे. याकरिता विविध क्षेत्रातील महिलांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करून स्वच्छतेचे कार्य अधिक तेज गतीने निरंतरपणे करीत राहावे असे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, विस्तार अधिकारी वर्मा यांची उपस्थिती होती.सीईओ जगताप म्हणाले, देशभरात स्वच्छतेचे कार्य करणाºया लोकांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्यामधून ३ लाख लोकांचे जीव वाचविल्याचे सिध्द झाले आहे. ग्रामस्तरावर १४ व्या वित्त आयोगामाधून घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गावात घनकचºयाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करता येणार आहे. बायोगॅस प्लॉन्टच्या माध्यमातून त्यावर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून उपयोगात आणता येणार आहे. स्वच्छतेची पहिली पायरी झाली आहे. स्वच्छतेचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी स्थानिकस्तरावर महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.शासनाने वैयक्तिक शौचालय मंजूर केले आहेत. ही शौचालये ३१ जानेवारी पर्यंत बांधून घ्यायची होती, परंतू त्यांचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पुन्हा त्यांना मुदतवाढ मिळाली असून आता फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम करता येणार आहेत. त्यामुळे सरपंचांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून गावात नागरिकांना तातडीने शौचालयाचे निमार्णासाठी प्रबोधन करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.यावेळी हरीयाना राज्यात कुरूक्षेत्रमध्ये महिलांचे राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सीईईओ जगताप यांच्यासह जिल्ह्यातील महिला सरपंचांनी मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यानंतर जिल्ह्यतील स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिला सरपंच, महिला स्वच्छता गृही, बचतगटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, अबाधा फाऊंडेशन तुमसर, हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन माडगी, असर फाऊंडेशन कलासंच, सरस्वती आदिवासी महिला गृप लोहारा तसेच पंचायत समितीस्तरावर कार्यरत पाणी व स्वच्छता केंद्राचे गट समन्वयक व समुह समन्वयक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांच्या हस्ते स्वच्छ शक्ती पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. संचालन व आभार राजेश येरणे यांनी मानले.