मुलांवर सुसंस्कार रूजवा

By Admin | Updated: February 12, 2015 00:32 IST2015-02-12T00:32:47+5:302015-02-12T00:32:47+5:30

ज्यांच्या मनात द्वेष भावना नाही, त्यांनाच न्याय मिळतो. प्रेमान जग जिंकता येतो. याकरीता आई-वडिलांनी मुलांवर महान त्यागी बाबा जुमदेव यांचे सदगुणी सुसंस्कारीत विचार

Work on child care | मुलांवर सुसंस्कार रूजवा

मुलांवर सुसंस्कार रूजवा

जवाहरनगर : ज्यांच्या मनात द्वेष भावना नाही, त्यांनाच न्याय मिळतो. प्रेमान जग जिंकता येतो. याकरीता आई-वडिलांनी मुलांवर महान त्यागी बाबा जुमदेव यांचे सदगुणी सुसंस्कारीत विचार रूजवावे, असे प्रतिपादन नागपुरचे परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले.
परमात्मा एक सेवक मंडळ परसोडीद्वारा हवन कार्य व सेवक संमेलनात अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते. उद्घाटन मनोहर देशमुख यांनी केले. यावेळी प्रभाकर वैरागडे, बाला नंदनकर, प्रकाश शाहु, सरपंच मंजुळा वंजारी, उपसरपंच भाऊराव वैरागडे, रघुपती फंदे, विश्वनाथ हटवार, श्रीराम साठवणे, नरेश पराते, वासुदेव मुंदेकर, दामोधर, श्रावण धारगडे, तेजराम भोतमांगे, गोपीचंद मारवाडे, सहादेव तिघरे, देवराव भोपे, गजानन लिचडे उपस्थित होते.
यावेळी मदनकर म्हणाले, अंधश्रद्धा मनात बाळगू नका, आधुनिक संगणकीय शिक्षण मुलांना शिकवा. स्त्रियांवर वाईट शब्दाचा प्रहार करू नका. परमात्माला सुगंध निघाला पाहिजे. तत्पूर्वी सकाळी मानवमंदिरातून जुमदेवबाबा यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली. यात्राचे ठाणा टी-पार्इंट मार्गाने परसोडी गावात ठिकठिकाणी जल्लोशात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा दरम्यान भोजनदान करण्यात आले. याप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आली. यात रांगोळी स्पर्धेत प्रणाली नाटकर, ज्योती हटवार, सयोगी हटवार यांचा समावेश होता. आरोग्य विषयक प्रसुन आयकेअर सेंटरद्वारे ८० लाभार्थ्यांचे नेत्रतपासणी करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालय, रक्तपेढीद्वारे डॉ. कोल्हे व चमु यांच्या मार्गदर्शनाने स्वेच्छेने २१ नागरिकांनी रक्तदान केले. यात कमलेश उरकुडे, मोरेश्वर समरीत, संजय आकरे, टेकचंद डोरले, डाकराम दारवाडे, संदीप कुडले, रवि साठवणे, शुभम हटवार, हरिश हटवार, घनश्याम डोरले, राम बांगळकर, गणपत दादुरवाडे, रामा धावडे, प्रदीप हटवार, नंदा वंजारी, प्रदीप बांगळकर, दर्शन फंदे, एकनाथ डोरले, प्रदीप रोकडे, ओमप्रकाश दादुरवाडे यांचा समावेश आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात कराटे प्रदर्शन, समाज प्रबोधनपर युवा बिरादरी परसोडीचे कार्यक्रम समावेश आहे. प्रास्ताविक प्रभु हटवार यांनी केले. संचालन राधेश्याम बांगळकर यांनी आभारप्रदर्शन प्रविण हटवार यांनी केले. यावेळी प्रकाश निंबुळकर, नत्थु चोपकर, दिनदयाल वंजारी, विनायक हटवार, मोहन वंजारी, लोकेश हटवार, कैलाश हटवार, बळीराम गुरनुले, गणेश दादुरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Work on child care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.