७३ पैकी ३८ जागांवर लागणार महिलांची वर्णी

By Admin | Updated: July 3, 2016 00:22 IST2016-07-03T00:22:08+5:302016-07-03T00:22:08+5:30

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या भंडारा, तुमसर आणि पवनी नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण शनिवारला दुपारी त्या-त्या नगर परिषद कार्यालयात घोषित करण्यात आले.

Women's wings for 38 seats out of 73 | ७३ पैकी ३८ जागांवर लागणार महिलांची वर्णी

७३ पैकी ३८ जागांवर लागणार महिलांची वर्णी

नगरपरिषद प्रभाग आरक्षण घोषित : भंडाऱ्यात प्रभाग सात, तुमसरात प्रभाग ११ तर, पवनीत प्रभाग चारमध्ये तीन उमेदवार राहणार
भंडारा : डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या भंडारा, तुमसर आणि पवनी नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण शनिवारला दुपारी त्या-त्या नगर परिषद कार्यालयात घोषित करण्यात आले. ५० टक्के महिला आरक्षणानुसार तिन्ही पालिकेत एकूण ७३ जागांपैकी ३८ जागांवर महिला सदस्यांची वर्णी लागणार आहे.
भंडारा नगरपालिकेतील १६ प्रभागात ३३ सदस्यसंख्या असून यात १६ पुरूष व १७ महिला, तुमसर पालिकेतील ११ प्रभागात २३ सदस्यसंख्या असून ११ पुरूष व १२ महिला तर पवनी पालिकेतील ८ प्रभागात १७ सदस्यसंख्या असून ८ पुरूष व ९ महिला सदस्य राहतील.
भंडारा नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी व मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. भंडारा नगर पालिकेत प्रभाग क्र. १ मध्ये ओबीसी महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. २ मध्ये ओबीसी महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ५ मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ६ मध्ये ईतर मागासवर्गीय महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ७ मध्ये ईतर मागासवर्गीय सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला दोन जागा, प्रभाग क्र. ८ मध्ये ईतर मागासवर्गीय महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ९ मध्ये ईतर मागासवर्गीय सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. १० मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ११ मध्ये ईतर मागासवर्गीय सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. १२ मध्ये ईतर मागासवर्गीय महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. १३ मध्ये ईतर मागासवर्गीय सर्वसाधारण व खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. १४ मध्ये अनुसूचित जमाती महिला व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. १५ मध्ये अनुसूचित जाती (महिला) व खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. १६ मध्ये अनुसूचित जाती (महिला) व खुला प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग क्रमांक सातमधून तीन सदस्य निवडून जाणार आहे. आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम चे वातावरण आहे.
तुमसर पालिकेत १२ महिलांना संधी
तुमसर : तुमसर नगरपरिषदेतील ११ प्रभागातून २३ नगरसेवकांची निवडणूक होईल. यात १२ महिला व ११ पुरूषांचा समावेश आहे. प्रभाग रचना उत्तरेकडून पूर्व पश्चिम व दक्षिण अशी करण्यात आली. साधारणत: एक प्रभाग ३५०० ते ४२०० मतदारसंख्येचा आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून तीन नगरसेवक निवडून जाणार आहे.
तुमसर नगरपरिषदेच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, मुख्य लिपिक किशोर साखरकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग क्र. १ मध्ये अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जाती महिला, व सर्वधारण, प्रभाग क्र. ३ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रभाग क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ७ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ८ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ९ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० मध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ११ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे.
प्रभाग क्र. ९ मध्ये अनुसूचित जमातीची मतदाराची संख्या १६७ इतकी आहे, परंतु तिचे अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाल्याने प्रभाग क्र. १० मध्ये अनुसूचित जमाती मतदारांची संख्या केवळ १३७ असूनही प्रभाग आरक्षित करण्यात आला. प्रभाग क्र. २ व ९ मध्ये ईश्वरचिठ्ठीने अनुसूचित जाती महिला आरक्षण सोडत निघाली.
पवनीत नगर पालिकेत महिलाराज
पवनी : नगर परिषदेच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, नायब तहसिलदार व्ही.आर. थोरवे व नायब तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणानुसार ८ प्रभागातील १७ जागापैकी ९ जागा महिलांकरिता आरक्षीत आहेत. महिलांकरीता जागा आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवकांचे समिकरण बिघडणार आहेत.
प्रभाग क्र. १ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ मध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ६ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ७ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ८ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण असे आरक्षण आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या तीनपैकी दोन जागा महिलांकरीता, अनुसूचित जमातीची एकमेव जागा महिलांकरीता, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या पाचपैकी दोन जागा महिलाकरीता तसेच सर्वसाधारणच्या ८ जागांपैकी ३ जागा महिलांकरीता आरक्षीत आहेत. आरक्षण सोडतीदरम्यान उपस्थित नागरिकांनी प्रभाग रचनेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रभागरचनेवर आक्षेप नोंदविण्याची शक्यता आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: Women's wings for 38 seats out of 73

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.