महिलांची मते ठरणार निर्णायक
By Admin | Updated: September 29, 2014 23:00 IST2014-09-29T23:00:40+5:302014-09-29T23:00:40+5:30
एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. असे म्हटले जाते. त्यामुळे महिलांनी श्किणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ श्केल आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर

महिलांची मते ठरणार निर्णायक
भंडारा : एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. असे म्हटले जाते. त्यामुळे महिलांनी श्किणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ श्केल आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर महिलांनी त्यांच्यावरील ही समाज सुधारण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.
विधानसभा निवडणुकांचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या पक्षांची असलेली युती आणि आघाडी तुटली आहे. इतकेच नव्हे तर निवडणुका तोंडावर असताना केले जाणारे पक्षांतर याबबत सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. चुल व मुल या संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलामध्ये याविषयी चर्चा रंगत आहेत.
महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यंचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच केलेला दिसत नाही. परंतु आधुनिक काळातील महिला भगिनी हा विचार करू लागल्या आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या मतदार यादीत ९,१२,२०८ मतदारांची नोंद आहे. पुरुष मतदारांची संख्या ४,६४९८६ आहेत तर ४,४७,११९ महिला मतदार आहेत. सहाजिकच पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या कमी आहे. तरीही येत्या निवडणुकीत महिला वर्गाची मते खऱ्या अर्थाने निर्णायक ठरतील. यात वाद नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असो, पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी महिला भगिनींनी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. पक्षामुळे असो वा आरक्षणामुळे अथवा अचानक मिळालेली संधी परंतु स्वत:चे घर सांभाळून अधिकची जबाबदारी त्या पेलत आहेत.
राजकारणामध्ये महिलावर्गाची संख्या हाताच्या बेटावर मोजता येईल इतकी आहे. नेतृत्वासाठी पुढे आलेल्या महिला कमी असल्या तरी त्यांना राजकारण कळत आहे. राजकारणासाठी राजकारण की स्वार्थासाठी राजकारण हेही उमजू लागले आहे. इतकेच नव्हे तर आपापसात त्या चर्चाही करीत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिला वर्गाची मते निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहेत.
गृहिणी महिला देखील प्रिंट किंवा इलेटॅनिक्स माध्यमांद्वारे घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत. पक्षनिष्ठा म्हणून आजही गावातील, शहरातील कुटुंब पक्षाला पाठींबा देतात. पक्षाकडून मग कोणताही उमेदवार दिला जातो त्याला डोळे झाकून पाठिंबा देतात असे असले तरी सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांवर महिला वर्ग तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
गगनाला भिडणारी महागाई असो, महिला सुरक्षा असो त्याचप्रमाणे गावातील, शहरातील विकासकामे असोत वा रस्ते, पाणी आदी प्रश्नांवर त्या चर्चाची विनीमय करीत आहेत. सतत भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ आपल्यापुरता सिमीत विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा सर्वसामान्य उमेदवार बरा अशी प्रतिक्रिया ऐकू येऊ लागली आहे. स्वत:पेक्षा गावच्या किंवा रत्नागिरी शहराचा विकास त्यांना कळू लागला आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी अर्थात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता महिलावर्ग एकजुटीने बाहेर पडल्या तर फार मोठा बदल घडवू शकतात. इतकेच नव्हे तर मतदानाकरिता बाहेर पडण्याचे टाळले तरीही बदल संभवतो. एकूणच दोन्ही निर्णय महिलांचे आहेत. जे महत्वपूर्ण आहेत.
पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिला आता स्वत:च्या मनाने मतदान करू लागल्या आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या उत्स्फूर्तरित्या बाहेर पडू लागल्या आहेत. शिवाय समाजातील घडामोडी व राजकारणाचा अभ्यास करू लागल्याने योग्य काय? अयोग्य काय याबाबत सजग झाल्या आहेत. विकासकामे, समस्यांना प्राधान्य देत मतदान करण्यात आले तर निश्चितच चित्र पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)