‘मदर्स डे’निमित्त पोलीस विभागातर्फे महिला मेळावा
By Admin | Updated: May 11, 2017 00:26 IST2017-05-11T00:26:13+5:302017-05-11T00:26:13+5:30
पोलीस मुख्यालय येथील सभागृहात पोलीस अधीक्षक विनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली ‘मदर्स डे व वुमन्स डे निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

‘मदर्स डे’निमित्त पोलीस विभागातर्फे महिला मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस मुख्यालय येथील सभागृहात पोलीस अधीक्षक विनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली ‘मदर्स डे व वुमन्स डे निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मृणाल जामदार डॉ. सुधाजी तिवारी, डॉ. अंकिता बोहरे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर आदी उपस्थित होते.
मृणाल जामदार यांनी आयुर्वेद विषयाबाबत माहिती दिली. डॉ. अंकिता बोहरे यांनी लघुउद्योग विषयावर माहिती दिली. डॉ. सुधा तिवारी यांनी सर्वसामान्य महिलावंर होणाऱ्या ताणतणाव मुळे शरीरावर होणाऱ्या आजारांविषयी माहिती दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी पोलीस दलातील महिला पोलिसांनी दैनंदिनी बाबी विषयी शिस्त पाळायला पाहिजे. कर्तव्य करीत असताना महिलांना पारिवारिक अडचणी येत असतात. जर त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी नि:संकोचपणे अडीअडचणी सांगितल्या पाहिजे. त्यांच्या समस्येचे निराकरण करू. कुटंूबातील महिला सदस्य जर आजारी पडली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटूंबावर होतो. महिलांनी आरोग्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. तणावाच्या परिस्थिती पासून दूर रहायला पाहिजे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांनी महिलांच्या दैनंदिनी कौटुंबिक बाबीवर मार्गदर्शन करून ज्या महिलांनी पोलीस तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस दलामध्ये ज्या महिला, कर्मचारी यांनी पोलीस तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली त्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक विनीता साहू यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध पथनाट्य तसेच आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक लांजेवार, पोलीस स्टेशन शाखेतील तसेच पोलीस मुख्यालय येथील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबातील महिला सदस्या मोठ्या संख्येत उपस्थित होते. संचालन स्मिता गालफाडे व आभार प्रदर्शन पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी केले.