परसोडी येथे महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:30+5:302021-03-25T04:33:30+5:30
यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्र शहापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हिना सलाम, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, ग्रामपंचायत सदस्य ओमकरन थापा, प्रणाली ...

परसोडी येथे महिला मेळावा
यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्र शहापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हिना सलाम, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, ग्रामपंचायत सदस्य ओमकरन थापा, प्रणाली चव्हाण, श्यामकला चकोले, ग्रामविकास अधिकारी एन. एम. रंगारी, शहापूर सर्कलच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस गावातील महिला किशोरवयीन मुली उपस्थित होते. महिला मेळाव्यात मंगला गजभिये यांनी गरोदर माता व लहान बालके यांच्या पोषण आहार विषयी मार्गदर्शन केले. डॉ. हिना सलामे यांनी महिलांनी गरोदरपणात घ्यावयाची काळजी आणि कुमारवयीन मुलींनी आरोग्य विषय घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पोषण आहार पंधरवडा अंतर्गत बीपी, शुगर, थायराईड, सीबीसी, महिला विषयक तपासणी करण्यात आली. महिला मेळाव्यात महिला पोषण आहार विषयी विविध स्टॉल लावण्यात आले. प्रास्ताविक सुधा कालेश्वर यांनी संचालन अश्विन हटवार यांनी तर आभार उषा गाढवे यांनी मानले.