महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:31+5:302021-01-20T04:34:31+5:30
वरठी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल व आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरठी येथील ५० ...

महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
वरठी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल व आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरठी येथील ५० महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सरपंच श्वेता येळणे व पंचायत समिती सदस्य आकांक्षा रितेश वासनिक यांच्या पुढाकाराने सदर प्रेवेश घेण्यात आले. विविध राजकीय पक्षात व सामाजिक कार्यात कार्यरत महिलांनी यावेळी प्रवेश केला. यात अनिता धूमकेतु गजभिये, सुधा मिलिंद बंसोड, दुर्गा नरेंद्र ठाकुर, राजश्री शैलेश मेश्राम, सूर्यकांता शेषराज रामटेके, माधुरी गिरिष खोब्रागडे, सविता प्रवीण खांडेकर, प्रियंका नितिन वासनिक, माधुरी दशरथ गोमासे, टीना नरेंद्र मेश्राम, सविता भाऊदास चोले, प्रियंका सचिन शिवेकर, प्रतिभा रमेश कोर्वेकर, मीना शंकर डोनादकर, आरती दिलीप बडगे, रेखा पुरुषोत्तम नानवटकर, अनिता शैलेश मेश्राम, पदमा किशोर चवलीवार यांचा समावेश आहे. प्रवेश कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे, पंचायत समिती सदस्य आकांक्षा वासनिक, सरपंच श्वेता येळणे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, रितेश वासनिक, अरविंद येळणे, अनिल काळे उपस्थित होते.