अड्याळ पोलीस ठाण्यात महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:38+5:302021-03-09T04:37:38+5:30
अड्याळ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व महिला पोलीस पाटील व अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये ...

अड्याळ पोलीस ठाण्यात महिला दिन
अड्याळ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व महिला पोलीस पाटील व अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या सर्व पोलीस महिला व उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते ठाणेदार सुशांत पाटील यांनी देशात व जगातसुद्धा नावलौकिक करणाऱ्या महिलांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून त्यांची यशोगाथा, वीरगाथा सांगितली. आजही महिला कुठेच कमी नाहीत. कोणत्याही क्षेत्रात आजही महिला पुरुषांच्या पुढेच आहेत. त्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यावर नियमित नियोजन करत राहिले तर निश्चितच यश पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, तसेच जागतिक महिला दिनाचे महत्त्वसुद्धा उपस्थिताना यावेळी सांगितले. प्रकाश महाविद्यालयात वर्ग १२ वी विज्ञान विभागात शिक्षण घेत असणाऱ्या वैष्णवी जिभकाटे हिने हातात घेतली होती. अड्याळ पोलीस स्टेशनची सूत्र, एक दिवसीय ठाणेदार बनणे, कामकाज सांभाळणे आणि अनुभव घेणे, तसेच आज बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी पोलीस खात्यात जायला सडेतोड मेहनत घेतात; पण या विभागात यायच्या आधी एकदा तरी आपण आपल्याच गावातील पोलीस स्टेशन गाठून तेथील कामकाज कसे आणि कोणत्या प्रकारे चालतो आणि विविध विषय कसे हाताळले जातात, याविषयी जाणून घेणे हे सुद्धा अतिशय उपयुक्त ठरू शकते आणि महत्त्वाचे म्हणजे माहिती मिळेल असेही मत यावेळी तिने व्यक्त केले. यावेळी महिला पोलीस पाटील व महिला पोलीस यांनी विविध विषयांवर चर्चा केली.