महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:26 IST2017-12-19T23:26:29+5:302017-12-19T23:26:56+5:30
वर्तमान स्थितीत महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.

महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळावे
आॅनलाईन लोकमत
साकोली : वर्तमान स्थितीत महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. क्षेत्र कुठलेही असो महिलांचा सहभाग असतोच. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक सुबत्तेची गरज असते. यासाठी महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळावे व कुटुंबाच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा, असे मत साकोली वनविभागाचे वनक्षेत्राधिकारी आरती उके यांनी केले. साकोली वनकार्यालयात आयोजित स्वयंरोजगारातून रोजगार निर्मिती या उपक्रमाअंतर्गत लाख बांगडी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहायक संरक्षक पवार उपस्थित होते. यावेळी साकोली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाºया ग्रामस्थ समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.