विकासाकरिता महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावे
By Admin | Updated: November 8, 2015 00:42 IST2015-11-08T00:42:06+5:302015-11-08T00:42:06+5:30
एखादी महिला शिक्षित असली तर ती संपूर्ण कुटूंबाला शिक्षित करते हे सर्वश्रूत आहे.

विकासाकरिता महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावे
चारुलता टोकस यांचे आवाहन : अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
तुमसर : एखादी महिला शिक्षित असली तर ती संपूर्ण कुटूंबाला शिक्षित करते हे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच आज आधुनिक युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याही पुढे जात आहे. त्यामुळे आता महिलांनीही राजकारणात सक्रिय होवून सर्वप्रथम गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा व राज्याचा विकासही महिलाच करू शकते, असा विश्वास दर्शवून महिलांनी राजकारणातही सक्रीय व्हावे, असे आवाहन नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले.
तुमसर येथे आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संमेलन व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी मंदा ठवरे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, कांता पराते, आनंदराव वंजारी, जिया पटेल, मधुकर लिचडे, प्रेमसागर गणवीर, नारायण तितीरमारे, मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितीरमारे, सुनिल गिरीपुंजे, प्रभू मोहतुरे, राजकपूर राऊत, चुन्नीलाल ठवकर, माणिकराव ब्राम्हणकर, शालिकराम गौरकर, राजेश चोपकर, सुरेंद्र पाटील, प्रेमदास राऊत, दिलीप चोपकर, लक्ष्मी कहालकर, बाळा ठाकूर, ज्योती गणवीर, नामदेव कांबळे, खुशाल पुष्पतोडे, प्रमिला पिकलमुंडे, गळीराम बांडेबुचे, निरज गौर, शैलेश पडोळे, निळकंठ टेकाम, विनायक बुरडे आदी उपस्थित होते.
चारुलता टोकस म्हणाल्या, भाजपच्या सरकारवर आम जनतेने विश्वास दर्शवून त्यांना बहुमतात आणले. जनतेने दिलेला कौल आम्ही मान्यही केला. मात्र भाजपने वाटलेली आश्वासनाची खैरात जनतेच्या पचनी पडली नाही. म्हणूनच वर्षभरात त्यांना त्यांची जागा जनतेनी मोहाडी नगरपंचायती निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. त् भंडारा जिल्हा महिला अध्यक्षा सीमा भुरे यांनी वाचन करीत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात खेमराज पंचबुद्धे, जि.प. सदस्य नंदलाल गुर्वे, शंकर राऊत, शालू दिपटे, मधुश्री गायधने, अॅड.निशा भवसागर, शोभा बुरडे, मेघा उटानेसह कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. तर जिल्हा परिषद व नगरपंचायतमध्ये निवडून आलेले काँग्रेसच्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. संचालन कुसुम कांबळे, आभार रुपलता जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमकरिता भारती निमजे, सत्यशिला रहांगडाले, ज्योती चिंधालोरे, स्वाती बोंबले, नलीनी डिंकवार, सरस्वता मेश्राम, बागडे, अंजू राजाभोज, निरंजना साठवणे,राऊत, लक्ष्मी मोहतुरे, मेघा उताने, सीमा साठवणे, वंदना मेश्राम, लक्ष्मी मोहतुरे, मेघा उताने, सीमा साठवणे आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)