महिलांनी स्वावलंबी होणे काळाची गरज
By Admin | Updated: March 14, 2016 00:32 IST2016-03-14T00:32:46+5:302016-03-14T00:32:46+5:30
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दिशा दिली, म्हणून आजच्या महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.

महिलांनी स्वावलंबी होणे काळाची गरज
धोप येथे महिला मेळावा : चरण वाघमारे यांचे प्रतिपादन, सदस्यांचा सत्कार
उसर्रा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दिशा दिली, म्हणून आजच्या महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील ग्राम धोप येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मोहाडी बीट जांब अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा धोपच्या प्रांगणात महिला मेळावा व बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्या मंजुषा गभने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषद सदस्या राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य किरण भैरम, पं.स. सदस्या भाग्यश्री चामट, सरपंच मंगला पिकलमुंडे, सरपंच विद्या पटले, माजी उपसभापती खुशाल कोसरे, नरेंद्र पिकलमुंडे, जगदीश शेंडे, महेंद्र मेश्राम, जगदीश पंचभाई, प्रकल्प अधिकारी लांजेवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका गीता उईके, पोलीस पाटील सुरेश निमकर, ग्रामसेवक कावळे आदी उपस्थित होते.
आमदार चरण वाघमारे म्हणाले, शासनातर्फे आता बचत गटातील महिलांना बिनव्याजी कर्ज देणार आहे. त्यामुळे महिला बचत गटासाठी आता सुगीचे दिवस आले आहे.
या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, किशोरवयीन मुलीचे नृत्य, कलापथक आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकाद्वारे महिला जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार वाघमारे यांच्या हस्ते तंटामुक्त ग्रामद्वारे गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी लांजेवार यांनी केले. संचालन व आभार पर्यवेक्षिका गीता उईके यांनी मानले. (वार्ताहर)