महिला मजुरांची पं.स. कार्यालयात धडक
By Admin | Updated: April 28, 2016 00:24 IST2016-04-28T00:24:05+5:302016-04-28T00:24:05+5:30
बोरी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर वाजवीपेक्षा जास्त कामे करूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याने काम बंद करून...

महिला मजुरांची पं.स. कार्यालयात धडक
बोरी येथील प्रकार : रोहयोच्या अत्यल्प मजुरीची तक्रार, बोरी ते खापा पायदळ मार्च
तुमसर : बोरी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर वाजवीपेक्षा जास्त कामे करूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याने काम बंद करून ५६ महिला व १३ पुरुषांनी भर उन्हात बुधवारी सहा कि.मी. पायदळ पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार दिली. सदर कामावर नियमानुसार प्रथमोपचार पेटी, हिवरी नेट व पिण्याची पाणी नाही. उष्णतेच्या लाटेत महिलांचा जीव धोक्यात आला आहे. बोरी येथे म. ग्रा. रोजगार हमी योजनेअंतर्गत शालीक नंदूरकर ते शिशुपाल बोरकर यांचे शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम दि. २७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)
मजुरीसाठी उन्हाची तमा नाही
या कामावर ५६ महिला व १३ मजूर कामावर आहेत. ७० ते ८० मिटरपेक्षा जास्त अंतरावरून माती नेऊन येथे घालावी लागत आहेत. ७० ते ८० मिटर पेक्षा जास्त अंतरावरून माती नेऊन येथे घालावी लागत आहे. पुरुष मजूर माती खोदकाम करतात तर महिला रस्त् यावर माती घालण्याची कामे करतात.
जेवढे काम तेवढे दाम असा या योजनेचा नियम आहे. परंतु किमान १२५ ते १३५ रुपये मजुरी येथे पडणे गरजेचे आहे. तेव्हाच उष्णतेच्या लाटेत काम करण्याचा फायदा होईल असा प्रश्न या महिलांनी मांडला. या महिलांना ८० ते १०० रुपये मजुरी येथे मिळाली आहे. ७० ते ८० मिटर अंतर माती नेऊन घालण्यात वेळ येथे वाया जात असल्याने मजुरी कमी मिळण्याची शक्यता आहे.
बुधवारी या महिला पुरुष मजुरांना काम बंद करून पायदळ पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार केली. बाजूच्या गावातील मजुरांना १५० ते १७० रुपये दर दिवशी मजुरी कशी मिळते असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. येथे मजुरांना जॉब कार्ड अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही असेही या महिलांनी 4सांगितले.
नियमानुसार कामाच्या स्थळी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी व हिरवी नेट अशा मूलभूत सोयती सुविधांचा अभाव आहे. ही बाबही या महिला मजुरांनी खंडविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी पं.स. गटनेता हिरालाल नागपुरे उपस्थित होते.
रोजगार हमी कामावरील मजुरांना किमान १९३ रुपये मजुरी उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु ती मिळत नाही. सकाळी ७ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ अशा कामांच्या वेळा आहेत. अनेक ठिकाणी मजुरीची बोंब अनेक वर्षापासून सुरु आहे. परंतु त्यात सुधारणा शासनाने अजूनपर्यंत केलेली दिसत नाही.
सखोल चौकशीची गरज
(पान १ वरून) प्रकरणाची माहिती शासनाच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठांना दिल्यास उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. चौकशी झाल्यास 'त्या' अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे नजरा लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
मजुरांना जॉब कार्ड, प्रथमोपचार पेटी व पाण्याची सोय शुक्रवारपासून करण्यात येईल. मी स्वत: कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी करणार आहे. मजुरांवर अन्याय होणार नाही.
- केशव गड्डापोड
खंडविकास अधिकारी, तुमसर.