महिला मजुरांचा हल्लाबोल

By Admin | Updated: May 19, 2016 00:24 IST2016-05-19T00:24:35+5:302016-05-19T00:24:35+5:30

भंडारा तालुक्यामध्ये गोपीवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पांदण मातीकरणाचे काम सुरु आहे. या कामावर ३५० मजूर काम करीत आहे.

Women laborer | महिला मजुरांचा हल्लाबोल

महिला मजुरांचा हल्लाबोल

प्रकरण गोपीवाडा ग्रामपंचायतीचे : अत्यल्प मजुरीमुळे महिला त्रस्त
खरबी / जवाहरनगर : भंडारा तालुक्यामध्ये गोपीवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पांदण मातीकरणाचे काम सुरु आहे. या कामावर ३५० मजूर काम करीत आहे. पण मजुरी ही १८ रुपये ते ३० रुपये पर्यंत बँक खात्यामध्ये जमा झाल्याने मजुरांमध्ये असंतोष पसरला आहे. मजुरीच्या मागणीसाठी महिला मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला.
मजुरांनी मिळालेल्या मजुरी व्यथा ही ग्रा.पं. सरपंच नूतन झंझाड व उपसरपंच जयंत बुधे यांच्या समोर मांडली. यावर उपसरपंच जयंत बुद्धे यांनी जेवढे काम तेवढेच दाम मिळत असून ही अधिनियमनानुसार असून यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोणताही हस्तक्षेप नाही आहे. या कामावर ३५० महिला मजूर व ५ मनुष्य मंजूर झाले आहे. या महिन्यामध्ये जमीन जड आल्यामुळे महिला वर्गाला माती खोदाई करणे कठीण जात असून सुद्धा पैशाच्या मागणीसाठी महिला मजूर भर उन्हात मातीचे काम करीत आहे. पण मजुरांना मजुरी कमी मिळाल्यामुळे महिला मजुरांमध्ये असंतोष आहे. (वार्ताहर)

Web Title: Women laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.