स्वच्छतेसाठी सरसावल्या महिला
By Admin | Updated: October 14, 2016 03:33 IST2016-10-14T03:33:07+5:302016-10-14T03:33:07+5:30
तुमसर तालुक्यातील पवनारा येथे स्वच्छतेच्या बाबतीत महिलांचा पुढाकार बहुमूल्य ठरला.

स्वच्छतेसाठी सरसावल्या महिला
ग्रामपंचायतीचे सहकार्य : अभियानातून जनजागृती
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा येथे स्वच्छतेच्या बाबतीत महिलांचा पुढाकार बहुमूल्य ठरला. व महिलांमुळे ज्याप्रमाणे घर स्वच्छ व निटनिटके राहते त्याप्रमाणे आपले गांव स्वच्छ,सुंदर,निरोगी ठेवण्याकरता गावातील सर्व महिला बचत गटांनी पुढाकार घेतला.
संत गाडगेमहाराज स्वच्छता अभियान राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पवनारा ग्रामपंचायतीने पुढाकारातून महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सुंदर, स्वच्छ, निरोगी,हागणदारीमुक्त गांव करण्याचा महिलांनी निर्णय घेऊन पुढाकार घेतला. स्वच्छ परिसर-स्वच्छ गांव, शौचालय बांधा आणि वापर करा, झाडे लावा-झाडे जगवा, मुलगी वाचवा-मुलगी शिकवा अशा प्रकारचे संदेशात्मक फलक घेवून प्रभातफेरी काढण्यात आली. या माध्यमातून ग्रामस्थांची जनजागृती करुन स्वच्छता राखण्याचा संदेश दिला. गावातील रस्ते, शाळा, आंगणवाड़ी, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला. रोग निर्मूलन, घाण नको, शौचालय असणे गरजेचे आहे, ग्रामस्थांनी गावच्या विकास कार्यात सहकार्य करावे, याबाबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मुकेश भांबोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसेवक नरेंद्र थाटमुर्रे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रफीक शेख, दत्तू घोड़मारे, खुशाल कुर्वे, रशिद शेख, मीतिन नागदेवे, दुर्गेश हाडगे, दिनेश पटले, गीता नेवारे, माला नागदेवे, कल्पना पटले, इंदु पटले व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन दुर्गा कुर्वे यांनी तर आभार रीना भांबोरे यांनी केले. (वार्ताहर)