शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:15 IST

Bhandara : उपाययोजनांची गती वाढवा; बंधारा बांधण्याचे काम झाले सुरू

सिराज शेख लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे मोहाडीवासीयांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नळाला दोन दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. मोहाडी शहराला उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो हे माहीत असतानाही नगर पंचायत प्रशासनाने यासाठी पूर्वीच कोणतेही नियोजन न केल्याने यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

नगरपंचायतीतर्फे सूर नदीवर लाखो खर्चुन करून बंधारा बांधून पेंचचे पाणी अडविले जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत नाही. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात असलेल्या समन्वय नसल्याने पेंचचे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा भुर्दंड अप्रत्यक्षपणे जनतेवर बसत असतो. 

बंधारा बांधण्याचे काम झाले सुरूसात-आठ दिवसांपासून सूर नदीबर पुलाला लागून बंधारा बांधण्याचे कार्य सुरू आहे. बंधारा बांधून झाल्यानंतर पेंच प्रकल्प अधिकाऱ्यांना विनवणी करून व पाण्याचे पैसे भरून पाणी आणले जाईल, तेव्हा कोठे मोहाडीवासीयांना दररोज नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळू शकेल व तेही अशुद्ध पाणी.

पैसे द्या पाणी न्या...सूर नदीवर जेथे मोहाडी शहराला पाणीपुरवठा करणारा पंप हाऊस आहे, त्या ठिकाणी तीन महिन्यांअगोदरच बंधारा बांधला असता तर शेतकऱ्यांसाठी सोडलेले पाणी नदीत येऊन पाणी अडविण्यात यश आले असते आणि पेंच प्रकल्पाचे पाणी पैसे देऊन घेण्याची वेळ आली नसती. मागील महिन्यापर्यंत सूर नदी पात्रातून पाणी वाहत होते. तेच पाणी जर पूर्वी अडविले गेले असते तर जून महिन्यापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले असते.

पेंचचे पाणी नगरपंचायतीसाठी, लाभ अनेक ग्रामपंचायतींनामोहाडी नगरपंचायत पाण्याचे पैसे भरून पेंचचे पाणी आणते. परंतु पेंच प्रकल्पापासून मोहाडी पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहोचताना मधात अनेक ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी सूर नदीकाठावर आहेत. त्या ग्रामपंचायती फुकटात या पाण्याचा लाभ घेतात. एवढेच नाही तर नदीत ठिकठिकाणी असलेल्या खड्यात हे पाणी साचून राहते व त्याचा फायदा जनावरांनासुद्धा होतो. परंतु या पाण्याच्या भुर्दंड नगरपंचायत भरत असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाणीटंचाई विषयाखाली पेंचच्या पाण्याचा कोणताही पैसा न देता पेंच प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकbhandara-acभंडारा