महिला-पुरूषांना समान संधी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:01:00+5:30

भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन हत्या आणि जेएनयू दिल्ली येथील शुल्क वाढी विरूद्ध लढणाऱ्या विद्यार्थी मुली-मुलांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

Women and men need equal opportunities | महिला-पुरूषांना समान संधी हवी

महिला-पुरूषांना समान संधी हवी

Next
ठळक मुद्देहिवराज उके : भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशनची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिलांना सर्वात जास्त अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. निर्णय प्रक्रियेत सुद्धा भेदभाव केला जातो. हा अन्याय आहे. तेव्हा माणूसकी आणि घटनात्मक मूल्यांचा विचार करता विकासासाठी आणि समानतेसाठी महिला-पुरूषांना समान संधी हवी आहे, असे प्रतिपादन महिला फेडरेशनच्या सभेत भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक हिवराज उके यांनी केले.
भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन हत्या आणि जेएनयू दिल्ली येथील शुल्क वाढी विरूद्ध लढणाऱ्या विद्यार्थी मुली-मुलांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यातील दोषींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. यावेळी श्रीवंता अंबुले, हिवराज उके, शमीम बानो खान व सदानंद इलमे यांनी मागदर्शन केले.
या सभेत भंडारा तालुका कौंसिलच्या सर्व महिला पदधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बावणे कुणबी समाज मंगल कार्यालय भंडारा येथे होणाºया भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा अधिवेशनाची संपूर्ण जवाबदारी स्विकारण्यात आली.
याच सभेत महिला फेडरेशनच्या भंडारा तालुका कमेटीची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष सीमा फुले, उपाध्यक्ष शमीम बानो खान, सचिव ममता तुरकर, सहसचिव सरस्वता देशमुख, कोषाध्यक्ष छबी पाचे, सदस्य रत्ना इलमे, श्रीवंता अंबुले, अंजिरा उके, महानंदा गजभिये, अल्का सतदेवे, ललिता तिजारे यांचा समावेश करण्यात आला.
आभार सचिव ममता तुरस्कर यांनी मानले. या सभेला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Women and men need equal opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला