महिला व बाल संरक्षण कार्यक्रम
By Admin | Updated: July 30, 2016 00:32 IST2016-07-30T00:32:36+5:302016-07-30T00:32:36+5:30
भारताच्या राज्यघटनेत महिला व बालकांसाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.

महिला व बाल संरक्षण कार्यक्रम
सुदृढ समाजासाठी बाल संरक्षणाची गरज
लवारी : भारताच्या राज्यघटनेत महिला व बालकांसाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे. बालक हा समाजाचा घटक असून उद्याच्या उत्कर्षासाठी चांगल्या निकोप व सुदृढ समाजरचनेसाठी बाल संरक्षण होणे गरज असल्याची प्रतिक्रिया साकोलीचे ठाणेदार राऊत यांनी व्यक्त केले.
नम्रता विद्यालयात आयोजित महिला व बाल संरक्षण कायदेविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. तालुका संरक्षण अधिकारी कक्ष साकोली व राष्ट्रीय महिला विकास संस्था बाम्पेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन उमरी लवारी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुका महिला समुपदेशिका इंद्रायणी कापगते, मंगला कापगते, सुमिता धकाते, प्राचार्य ए. पी. काशिवार, पर्यवेशिका हातझाडे, भाजीपाले आदी उपस्थित होते.
इंद्रायणी कापगते यांनी विद्यार्थीनींना लैगिक छळापासून स्वत:चे रक्षण कसे करावे यावर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी मुला-मुलींना मार्गदर्शन केले. कौटुंबिक छळ, लैंगिक छळ हे मागासलेपणाचे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. लैंगिक छळाचा वेळीच प्रतिकार झाला तर होणाऱ्या फार मोठ्या घटनेपासून आपला बचाव होऊ शकतो असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संरक्षण अधिकारी सी.एच. लोथे यांनी केले. संचालन प्रा. सविता खुणे यांनी केले. तर आभार नम्रता विद्यालयाचे प्राचार्य ए. पी. काशिवार यांनी मानले. (वार्ताहर)