महिलेचा सांगाडा सापडला
By Admin | Updated: February 21, 2017 00:19 IST2017-02-21T00:19:40+5:302017-02-21T00:19:40+5:30
तालुक्यातील परसोडी येथील तलावाशेजारी हाडाचा सांगाडा आढळला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.

महिलेचा सांगाडा सापडला
परसोडी येथील घटना : पाच महिन्यांपासून होती बेपत्ता
ााकोली : तालुक्यातील परसोडी येथील तलावाशेजारी हाडाचा सांगाडा आढळला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. कपड्यावरून ओळख पटली असून सदर मृतदेह हा झीराबाई ऊर्फ चंद्रभागा नामदेव क्षीरसागर (७०) रा. सुंदरी या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले.
झिराबाई क्षिरसागर या २७ सप्टेंबर २०१६ पासून बेपत्ता होत्या. त्यानंतर त्यांची बरीच शोधाशोध करण्यात आली, मात्र शोध लागला नाही. अखेर आज पाच महिन्यानंतर झिराबाईचा मृतदेहच सापडला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर तपास साकोली पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)