शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

By admin | Updated: October 6, 2016 00:47 IST

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धारगाव आरोग्य केंद्रातील घटना : ग्रामस्थांचा मृतदेहासह अधिकाऱ्यांना घेरावआमगाव (दिघोरी) : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविता रामलाल नेवारे रा.कवलेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. शस्त्रक्रियेदरम्यान चुकीची नस कापल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नागरिकांनी धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मृतदेहासह तब्बल चार तास पर्यंत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. भंडारा तालुक्यातील सविता नेवारे या ३२ वर्षीय महिलेला दोन अपत्ये आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन सदर महिला २८ सप्टेंबरला धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. २९ सप्टेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली. सविताला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात व त्यानंतर नागपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुकीची नस कापल्याने तिची प्रकृती ढासळली व यातच तिचा मृत्यू झाला.तिच्या मृत्यूला शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.टी. खंडारे व आरोग्य सेविका बांगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच नागरिकांनी गर्दी केली. नागपूरहून सविताचा मृतदेह दुपारी १ वाजताच्या सुमारास धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. संतापलेल्या जनसमुदायाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळीजिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, नायब तहसीलदार काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, यांच्यासह माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, अनिल गायधने, रुपेश खवास, संजय रेहपाडे, विनोद बांते, शेखर साखरे, राधेश्याम राऊत, बाबुलाल बंसोड, सदाशिव बोंदरे, युवराज नेवारे व ग्रामस्थ उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांना ३५ लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी, सबंधित डॉक्टराची वैद्यकिय नोंदणी रद्द करण्यात यावी, कुंटुबियातील एकाला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी उईके यांनी दोन लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा करून तात्काळ स्वरुपात ५० हजार रुपये देण्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. डॉक्टर खंडारे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)मुले झाली आईविना पोरकीसविताला सात महिन्यांची मुलगी व पाच वर्षांचा एक मुलगा आहे. सवितावर शस्त्रक्रिया करताना तिच्या मुलांना कुटुंबियांनी सांभाळ केला. मुलगी दुधावरची असल्याने आई लवकरच घरी येईल, असे मुलांना समजविण्यात येत येत होते. परंतु ’आई हवी’ हा मुलांचा हट्ट कायमचा हट्टच राहिला. लहानगी आईच्या मृतदेहाला एकटक बघत असताना अनेकांची मने हेलावून गेली. जीवनाचा संघर्ष या छकुलीच्या डोळ्यात जणू सागर म्हणून वाहत होता. सविताचा पती ढसाढसा रडत असताना त्याला धीर तरी कसा द्यावा, हे सुचेनासे झाले.