महिलांना विविध उद्योग क्षेत्रात वाव

By Admin | Updated: May 28, 2017 00:30 IST2017-05-28T00:30:42+5:302017-05-28T00:30:42+5:30

महिला सक्षमीकरणाच्या युगात महिला बचत गटांनी उद्योगात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा.

Woman working in various industries | महिलांना विविध उद्योग क्षेत्रात वाव

महिलांना विविध उद्योग क्षेत्रात वाव

उषा डोंगरवार यांचे प्रतिपादन: रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिला सक्षमीकरणाच्या युगात महिला बचत गटांनी उद्योगात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. आज महिलांनी गृह उद्योगापासून मोठया उद्योगापर्यंत मजल मारली आहे. महिलांसाठी विविध उद्योगाचे द्वार खुले आहेत. जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक असून शेतीमध्ये लागणारे धान रोवणी ते कापणी या कालावधीत शेतीसाठी लागणारे यंत्र महिला बचत गटानी खरेदी करुन गरुजूंना यंत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले तरी या गटांना आर्थिक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र साकोलीच्या समन्वयिका डॉ. उषा डोंगरवार यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत प्रसार व प्रचार करण्यासाठी सुशिक्षित तरुण-तरुणी, रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा संचालित नाविदिषा लोकसंचालीत साधन केंद्र पवनी यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मी रमा सभागृह पवनी येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला माविमचे विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ, मत्स्य विकास सोसायटीचे प्रकाश पचारे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, माविमचे लेखा अधिकारी, साधन गटाच्या अध्यक्षा छाया चव्हाण, संगिता श्रीरंग, पी.पी. पर्वते, वाळके, शिवरकर उपस्थित होते.
डोंगरवार म्हणाल्या, स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापन महिलांनी आपल्या घरापासूनच करुन हा कचरा परसबागेत साठवल्यास त्याचे रुपांतर कंपोस्ट खतात होईल. खतामुळे झाडांना भरपूर फुले व फळे येतील. गांढूळ शेणाला खातात व त्यापासून सुध्दा उत्तम कंपोस्ट खत निर्माण होते. तसेच बैल गाई व म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी घरात गोबरगॅससाठी यांचा वापर करावा. सातबारावर पूरुषासोबत स्त्रियांचे नाव आले आहे म्हणजेच आपण आता मालक झालो. त्यामुळे त्या जमिनीच आरोग्य राखणे आपले काम आहे. जमिनीचे आरोग्य पत्रिका मिळावा. मातीचा मृदतपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले.
सोनकुसरे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करुन देणे आहे. या द्वारे महिला बचत गट विविध उद्योग करुन शकतात. २ लाखाचे वरील कर्जासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, गुमास्ता, उत्पन्नाचा दाखला, बँक स्टेटमेंटची आवश्यकता आहे. मुद्राचे व्यवसाय प्रशिक्षण लाभार्थ्यांस देण्यात येते तसेच माहिती सुध्दा देण्यात येते. स्टॉर स्वयंरोजगार संस्थेत मोफत प्रशिक्षण घेवून उद्योग उभारावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भारत सरकारच्या कृषि विभागाच्या निर्देशानुसार स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ, मत्स्य विकास सोसायटीचे प्रकाश पचारे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे आदींनी मार्गदर्शन केले.
त्यांनी मार्गदर्शनातून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास तालुक्यातील ८०० महिलांचा सहभाग होता. या रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता सबला नाविदिषा लोकसंचालित साधन केंद्राच्या सर्व सहयोगिनी, लेखापाल व कार्यकारिणी पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

Web Title: Woman working in various industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.