शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 15:41 IST

घरगुती वादातून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. पती तिला वाचवायला गेला असता दोघांचाही जळून मृत्यू झाला असून या दाम्पत्याचा तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला.

ठळक मुद्देभिलेवाडाची घटनातीन वर्षीय चिमुकला झाला अनाथ

भंडारा : घरगुती वादात पत्नीने अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचविण्यासाठी पती गेला असता दोघांचाही यात जळून मृत्यू झाला. तर आई-वडिलांच्या निधनाने तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला. ही घटना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

मेघा महेंद्र शिंगाडे (२९) आणि महेंद्र मिताराम शिंगाडे (४२) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. शनिवारी रात्री या दोघात उसनवारीच्या पैशावरुन वाद झाला. या वादात संतप्त मेघाने अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचविण्यासाठी महेंद्र धावला. मात्र मेघा ९६ टक्के तर महेंद्र ६६ टक्के जळाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

भिलेवाडा येथील महेंद्रचा विवाह पाच वर्षापूर्वी भंडारा तालुक्यातील पहेला येथील मेघासोबत झाला होता. महेंद्र हा डोडमाझरी ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्यांना तीन वर्षाचा रिहान नावाचा मुलगाही आहे. गत काही दिवसांपासून महेंद्रला दारुचे व्यसन लागले होते. त्यामुळेच पती-पत्नी नेहमीच वाद होत होता. शनिवारीही याच कारणावरुन वाद सुरू झाला. वादात मेघाने राॅकेल ओतून पेटवून घेतले आणि एका संसाराची राखरांगोळी झाली. तीन वर्षाचा रिहान मात्र अनाथ झाला.

या घटनेची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मिसळे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआगDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार