शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:49 IST

भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कारधा टोल नाकाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली. 

भंडारा : दुचाकीने शाळेत जात असलेल्या एका शिक्षिकेला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. यात ५६ वर्षीय शिक्षिकेचा जागीच अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कारधा टोल नाकाजवळ घडली.

रेखा बक्क्षीमल नागोरी रा. गुजराती कॉलनी, भंडारा असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या इटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज गुरुवारी आपल्या एक्टिवाने सकाळी १० च्या सुमारास त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान, कारधा टोलनाका जवळील चौरस्त्यावर वळण घेत असतानाच भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रेखा नागोरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती कारधा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू